Ukhana Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही उखाण्याचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पु्ण्याच्या एका तरुणाने भन्नाट उखाणा घेतला आहे. हा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा उखाणा प्रचंड व्हायरल होत आहे.

उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, याला उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त महिला नवऱ्याचे नाव घ्यायच्या. आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवविवाहित तरुण त्याच्या पत्नीचे नाव घेत उखाणा सांगताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नवविवाहित जोडपे दिसेन. व्हिडीओमध्ये तरुण मुलगा त्याच्या पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतो. उखाणा घेताना तो म्हणतो, “आता झाले आमचं लग्न, आता न कसली चिंता, न कसले भय… आकांक्षाचे नाव घेतो श्रीमंत दगडूशेठ की जय” त्यानंतर व्हिडीओवर बाप्पा मोरया हे गाणं सुरू होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. पुणेकरांन तर हा व्हिडीओ खूप आवडेल.

एका पुणेकर तरुणाने sk__1904 या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” श्रीमंत दगडूशेठ की जय..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान उखाणा घेतलाय.” तर एका युजरने लिहिलेय, “बाप्पा मोरया” आणखी एका युजरने लिहिलेय, “मन जिंकलस भाऊ.. ओन्ली बाप्पा लव्हर”

हेही वाचा : Video : श्रीमंतीचा दिखावा! चालत्या गाडीतून भर रस्त्यावर नोटा उडवताना दिसला तरुण, पोलिसांनी ठोठावला तब्बल एवढा दंड

श्रीमंत दगडूशेठ गणपती

पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तूसह दगडूशेठ गणपती मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.पुण्यात येणारा प्रत्येक व्यक्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन आवडीने घेतो. पुणेकरांसह अनेक लोकांची या गणपतीवर विशेष श्रद्धा आहे.