scorecardresearch

Premium

पीएमओ यूट्यूब चॅनेलच्या कमाईबाबत का माहिती देत नाही? काँग्रेस खासदाराने उपस्थित केला प्रश्न

पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलच्या सब्सक्राइबर्सची संख्या एक कोटींहून अधिक आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे यूट्यूबवर ५.२५ लाख फॉलोअर्स आहेत.

pm-modi-1
(file photo)

काँग्रेस नेते पी चिंदबरम यांचे पुत्र खासदार कार्तिकेय चिदंबरम यांनी पीएमओच्या यूट्यूबर चॅनेलवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करायचा होता, मात्र बोलू दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत सरकार असं का वागत आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. चिदंबरम यांनी आपल्या पोस्टमध्ये चॅनलवर जाहिराती चालवण्यास परवानगी आहे का? यातून कमाई होते का?, काही महसूल निर्माण झाला का? त्यांची स्क्रीनिंग होते का?, असे प्रश्न त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले आहेत.

चिदंबरम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, “पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनेलबाबत त्यांचा प्रश्न हा भारत सरकारचा विषय नसल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आला आहे. पीएमओच्या अधिकृत वाहिनीची सरकारला पर्वा नाही हे आश्चर्यकारक आहे.” पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलच्या सब्सक्राइबर्सची संख्या एक कोटींहून अधिक आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे यूट्यूबवर ५.२५ लाख फॉलोअर्स आहेत. शशी थरूर हे देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात पण त्यांना फक्त ४.३९ लाख लोक फॉलो करतात. दोघेही या बाबतीत मोदींच्या मागे आहेत. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही पंतप्रधान मोदींच्या आसपास दुसरा नेता नाही. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पीएम मोदींच्या फॉलोअर्सची जागतिक नेत्यांशी तुलना केल्यास ही संख्या आश्चर्यकारक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे यूट्यूबवर सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ३६ लाखांहून अधिक लोक ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना फॉलो करतात. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना ३०.७ लाख लोकं आणि इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना २८.८ लाख लोकं यूट्यूबवर फॉलो करतात.

chandigarh mayor election
Chandigarh : महापौरांच्या राजीनाम्यापाठोपाठ ‘आप’च्या तीन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश? चंदीगडमध्ये चाललंय काय?
Electoral Bonds Case
निवडणूक रोखे योजनेविरुद्ध दंड थोपटणारी काँग्रेसची ‘ती’ रणरागिणी कोण?; शेवटपर्यंत दिला न्यायालयीन लढा!
Sonia Gandhi filed candidature
सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, पण इंडिया आघाडीचे भवितव्य काय?
nirmala sitharaman budget speech
काँग्रेसच्या ‘फोन बँकिंग’मुळे सरकारी बँका कर्जाच्या खाईत; श्वेतपत्रिकेवरील चर्चेत सीतारामन यांचा काँग्रेसवर घणाघाती हल्लाबोल

Video: “आम्हाला युद्ध नको”, रशियन न्यूज चॅनेलच्या लाईव्ह शो दरम्यान विरोध, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी मानले आभार

मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra Modi या नावाने आहे. २६ ऑक्टोबर २००७ रोजी पीएम मोदी यांचं यूट्यूब खातं सुरु केलं होतं. मात्र त्यांनी चार वर्षांनंतर १८ मार्च २०११ रोजी पहिला व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ गुजरातच्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पातील आहे. या व्हिडीओला ३५,३७५ व्ह्यूज मिळाले होते. तर १४०० लाईक्स मिळाले आहेत. तेव्हापासून त्यांच्या चॅनलवर व्हिडीओ अपलोड होत आहेत. या चॅनलवरून पीएमओ इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि एक्झाम वॉरियर्स मंत्रज या यूट्यूब चॅनेलचा प्रचारही करतात. त्यांच्या चॅनलवर सरकारशी संबंधित योजना, थेट कार्यक्रमही दाखवतात. मोदींच्या चॅनलचा सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांगाचा आहे. १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मोदी एका तरुणाला भेटत आहेत. तरुण मोदींशी बोलतात आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. हा व्हिडिओ काशीचा आहे. हा १९ फेब्रुवारी २०१९ रोजी अपलोड केले होता. त्याला ७ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ११ लाख लाईक्स मिळाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Question on pmo youtube channel disallowed says karti chidambaram rmt

First published on: 16-03-2022 at 09:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×