scorecardresearch

FIFA World Cup 2018 FINAL: नेटकऱ्यांमध्ये रंगली पुतिन यांच्या डोक्यावरील छत्रीची चर्चा, कारण…

पुरस्कार सोहळ्यापेक्षा पुतिन यांच्या या राजेशाही थाटाचीच चर्चा सोशल नेटवर्किंगवर होताना दिसली

नेटकऱ्यांमध्ये रंगली पुतिन यांच्या डोक्यावरील छत्रीची चर्चा
रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्कोमध्ये पार पडलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. अनेक अर्थाने हा सामना ऐतिहासिक ठरला. अंतिम सामन्याबद्दलच्या ऑन आणि ऑफ फिल्ड अनेक गोष्टींची सोशल मिडियावर जोरदार चर्चा झाली. त्यातही सर्वाधिक भाव खाऊन गेला तो पुरस्कार प्रदान सोहळ्यामधील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा राजेशाही थाट.

पुरस्कार प्रदान सोहळा सुरु असताना अचानक पाऊस पडू लागला आणि स्टेजवर उभे असणारे अनेक मान्यवर त्याच पावसामध्ये उभे होते. मात्र पाऊस पडू लागताच लगेचच पुतीन यांच्यासाठी त्यांचा एक सुरक्षारक्षक मोठी छत्री घेऊन आला. विशेष म्हणजे केवळ पुतीन यांच्यासाठी छत्रीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या डावीकडे असणारे फीफाचे अध्यक्ष आणि उजवीकडे उभे असणारे फ्रान्सचे अध्यक्ष आणि क्रोएशियाच्या पंतप्रधान पावसात भिजच खेळाडूंचे अभिनंदन करत होते. काही मिनिटांनंतर इतर मान्यवरांसाठी छत्रीची व्यवस्था करण्यात आली. मात्र तोपर्यंत ते सर्व चिंब भिजले होते. त्यातही त्यांना देण्यात आलेल्या छत्र्या या पुतिन यांच्या डोक्यावर पकडण्यात आलेल्या छत्रीच्या तुलनेत आकाराने लहान होत्या. हा सर्व प्रकार नेटकऱ्यांच्या नजरेतून नक्कीच सुटला नाही. आणि पुरस्कार सोहळ्यापेक्षा पुतिन यांच्या या राजेशाही थाटाचीच चर्चा सोशल नेटवर्किंगवर होताना दिसली. पाहुयात याच छत्री प्रकरणावरून व्हायरल झालेले काही मजेदार ट्विटस…

पुरस्कार प्रदान सोहळ्यात छत्रीचीच चर्चा…

संपूर्ण रशियात एकच छत्री आहे?

शक्तीप्रदर्शन

…म्हणून पुतिन यांच्यावर त्याने पकडली छत्री!

एकटाच…

यामुळेच इतरांना छत्री नाही…

फ्रान्स जिंकले सर आता काय करायचे?

झलक अंतरराष्ट्रीय राजकारणाची?

My umbrella is my umbrella

एकच छत्री आणा कारण…

अशाप्रकारे पुतीन यांच्या डोक्यावरील छत्रीनेच पुरस्कार प्रदान सोहळा गाजला असेच म्हणावे लागेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russian president vladimir putin was the only one with an umbrella at the world cup while other world leaders stood in the rain

ताज्या बातम्या