सध्या उन्हाळ्याने जीव हैराण झालाय. फळांचा रस, कोल्डड्रिंकचा खप प्रचंड वाढला आहे. दिवसा दोनदा आंघोळ केली तरी लाही लाही होते. खिडकी उघडी ठेवावी तर दुपारी उन्हाच्या झळा आत येतात खिडक्या बंद कराव्यात तर गरमीने जीव हैराण होतो. वाळ्याचे पडदे लावण्याचा उपाय आहे खरा पण तेही मेंटेन करावे लागतात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही ना गरम होणं टाळण्यासाठी तुमच्या बिल्डिंगला प्लॅस्टिकचं कव्हर घाला”

हा असा उपाय सांगणारा अर्ध्या तासात हाॅस्पिटलमध्ये दाखल होईल

पण आता खरोखरच असं प्लॅस्टिकचं कव्हर आलं आहे की जे तुमच्या घरातलं तापमान कमी करून तु्म्हाला ‘गर्मी में छंडी का एहसास देईल’.
अमेरिकेतल्या कोलोरॅडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे प्लॅस्टिक तयार केलं आहे. साधं प्लॅस्टिक हे ‘पाॅलिथीन’ पासून तयार केलेलं असतं. पण हे प्लॅस्टिक ‘पाॅलि मिथाईल पेंटीन’ या रसायनापासून तयार केलेलं आहे. हे प्लॅस्टिक एकाचवेळी पारदर्शक फिल्म आणि प्रकाश परावर्तित करणाऱी फिल्म अशा पध्दतीने काम करतं. हे प्लॅस्टिक खिडक्यांना लावलं तर आपण नेहमीच्या काळ्या फिल्मसारखा प्रकाशकिरण शोषून घेत खोली थंड ठेवण्याचं काम करतो. तर तुमच्या घराच्या किंवा बिल्डिंगच्या बाहेरच्या भिंतीवर हे प्लॅस्टिक लावल्यानंतर भिती तापत नाहीत.
महत्त्वाचं म्हणजे या फिल्मचा वापर केला की घरातलं तापमान कमीत कमी २०% नी कमी होतं असं ही फिल्म बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हा फिल्मची एक चौरस मीटर फिल्म एका खोलीचं तापमान ४० अंश सेल्सियसपासून २० अंश सेल्सियसपर्यंत आणू शकते असं .या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists develop a special plastic cool plastic
First published on: 04-04-2017 at 18:21 IST