Viral Video : सोशल मीडियावर अनेक भयानक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकीवर बसलेले दोन तरुण भर रस्त्यावर थरकाप उडवणारा स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
सोशल मीडियावर तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. अनेक जण जीव धोक्यात घालून स्टंट करताना दिसतात. सध्या या व्हिडीओत सुद्धा दुचाकीवरील तरूण स्टंट करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओ एका कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने शुट केला आहे. या व्हायरल व्हिडीओत भर रस्त्यावर एक दुचाकीस्वार स्टंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा दुचाकीस्वार एकटा नाही तर या दुचाकीवर डबलसीट आणखी एक तरुण बसलेला आहे. त्यांचा धोकादायक स्टंट पाहून तुमच्याही अंगावर काटा येईन.
ThirdEye या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “येलहंका येथील एक दुचाकी कॅमेऱ्यात कैद झाली. आपण या लोकांची बाईक जप्त करू शकतो का? ही घटना २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:५० वाजताची आहे.” या कॅप्शनमध्ये येलहंका आणि बंगळूरूच्या ट्रॅफिक पोलिसांना टॅग केले आहे आणि त्यांना ही घटना कुठे घडली, याचे लोकेशन सुद्धा पाठवले आहे.

हेही वाचा : “मला नवरा पाहिजे” रडत रडत चिमुकलीने केला आईकडे हट्ट, व्हिडीओ एकदा बघाच…

यावर बंगळूरूच्या ट्रॅफिक पोलिसांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “यांच्यावर येलहंकाचे ट्रॅफिक पोलीस कारवाई करतील. व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी सुद्धा संताप सुद्धा व्यक्त केला आहे. एका युजरने व्हिडीओ पाहून लिहिलेय, “खूप छान सर” तर एका युजरने लिहिलेय, “हे काय चाललं? शहरात काही कायदा सुव्यवस्था आहे की नाही?”
व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. यापूर्वीही स्टंटचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. अनेक जण जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा प्रयत्न करतात पण असे करू नये. अनेक जण स्टंट करण्याच्या नादात जीव गमावून बसतात.