Smriti Irani Belly Dancer Outfit Photo: लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत मात्र सोशल मीडियावर सर्व पक्षांकडून प्रचाराचं रणशिंग केव्हाच फुंकलं गेलंय. प्रचारांमध्ये स्वतःच्या पक्षाचं कौतुक सांगण्याबरोबरच इतर राजकारण्यांचे पाय खेचणे हा एक प्रकार वर्षानुवर्षे आपण पाहिला आहे. असाच एक प्रकार सध्या भाजपच्या खासदार व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका व्हायरल फोटोच्या बाबत सुद्धा घडत असल्याचे दिसतेय. लाइटहाऊस जर्नलिझमला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. फोटोमध्ये स्मृती इराणी बेली डान्सिंग आउटफिटमध्ये दिसत आहेत. नेमकं या फोटोचं सत्य काय हे तपासून पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

फेसबूक यूजर Bablu Upa ने फोटो आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता ज्याला नंतर साडे सहा हजाराहून अधिक शेअर मिळाले.

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

इतर वापरकर्ते देखील हे एडिटेड फोटो शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही एका साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आमचा तपास सुरू केला. फोटोकडे बारकाईने पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की हा जुना फोटो असल्याचे दिसण्यासाठी फिल्टर लावले होते. आम्हाला Tripadvisor च्या वेबसाइटवर मूळ फोटो आढळला.

https://www.tripadvisor.com/LocationPhotoDirectLink-g298033-d316148-i42423974-Club_Exelsior-Marmaris_Marmaris_District_Mugla_Province_Turkish_Aegean_Coa.html

फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते: तुर्की BBQ मध्ये बेली डान्सर (अनुवादित) तपासादरम्यान आम्हाला समजले की, हा फोटो यापूर्वीही शेअर करण्यात आला होता. हाच फोटो २०२२ मध्ये शेअर करण्यात आला होता.

हे ही वाचा<< पाण्याच्या पंपातून वाहू लागली दारू; पोलीस सुद्धा भांडी भरून थकले, गुन्हेगारांनी केलेला बंदोबस्त पाहिलात का?

निष्कर्ष: बेली डान्सरच्या पोशाखात स्मृती इराणी यांचा फोटो एडिट करण्यात आला आहे. मूळ फोटोमधील महिला कलाकार वेगळी आहे.