Viral video: देशात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत असतात. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. अशातचं आता भटक्या कुत्र्याने एका तरुणावर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र एका महिलेनं या व्यक्तीला कुत्र्याच्या हल्ल्यातून बचावलं आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका दुकानाबाहेर दोन कुत्रे दिसत आहेत. यावेळी या दुकानातून एक तरुण बाहेर येतो आणि रस्त्यावर उभा राहतो. याचवेळी त्यातला एक कुत्रा अचानक तरुणावर हल्ला करतो. कुत्रा तरुणाचा पाय तोंडात धरतो आणि चावा घेतो. यावेळी तरुण स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत हे. मात्र कुत्रा इतका आक्रमक आहे की, तो तरुणाला अजिबात सोडत नाहीये. यावेळी बाजुला असलेली महिला या तरुणाच्या मदतीला येते आणि कुत्र्याशी सामना करुण या तरुणाचा बचाव करते.

या महिलेचं सर्वत्र कौतुक होत असून जर महिला तरुणाच्या मदतीसाठी धावून आली नसती तर कदाचीत कुत्र्यानं तरुणाचे लचके तोडले असते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> स्टंटबाजी करणं भोवलं! फोटोग्राफरच्या केसांना आग; लग्नातील थरारक VIDEO व्हायरल

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.