सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपणाला हसवणारे तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. पण यापैकी मोजकेच व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांना भावतात आणि पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. खरं तर, डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं, शिवाय डॉक्टरांनी रुग्णांना जीवदान दिल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला डॉक्टर नुकत्याच जन्मलेल्या बाळाला वाचवण्यासाठी तोंडाने सीपीआर देताना दिसत आहेत. महत्वाची बाब म्हणजे बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत आहे. डॉक्टरांनी बाळाला वाचवल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी डॉक्टरांचे कौतुक करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओत डॉक्टर सीपीआर देऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ mpanktiya नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर १३ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “डॉक्टर सुलेखा चौधरी, आगरा, यांनी नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती म्हणून सुरुवातीला त्याला ऑक्सिजन सपोर्ट दिला. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही, म्हणून डॉक्टरांनी तोंडाने ७ मिनिटांपर्यंत सीपीआर दिला, ज्यामुळे मुलाला जीवदान मिळाले.”

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हेही वाचा- चिकन सँडविच खरेदी करायला गेला आणि लखपती बनला; क्षणात पालटलं व्यक्तीचं नशीब

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “डॉक्टर हे देव आहेत; अनेक डॉक्टर आजही खूप प्रामाणिकपणाने आपले काम करतात.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “तुम्ही खरे देव आहात.” तर तिसऱ्याने लिहिलं, “पृथ्वीवरील खरे देवदूत.”