scorecardresearch

Video Viral: बँडच्या तालावर कुत्र्याचा दोन पायावर जबरदस्त डान्स, तुम्हीही कराल कौतुक

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

Dog_Dance
Video Viral: बँडच्या तालावर कुत्र्याचा दोन पायावर जबरदस्त डान्स, तुम्हीही कराल कौतुक

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ तर मोठ्या आवडीने पाहिले जातात. कुत्रे, मांजरींच्या माणसांसारख्या कृती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. श्वानप्रेमींकडून अशा व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कुत्रा हा माणसांसोबत राहणारा सर्वात निष्ठावान आणि तितकाच हुशार प्राणी आहे. त्यामुळे कुत्र्यासोबत संवाद साधताना अनेक श्वानप्रेमी दिसतात. कुत्र्याला ट्रेनिंग देऊन उठण्याबसण्यापासून कमांड दिल्या जातात. कुत्राही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो. असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर पाळीव कुत्रा नाचण्याचा आनंद लुटत असल्याचा एक व्हिडृीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही आनंद होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्रा दोन पायांवर आनंदाने नाचताना दिसत आहे. एकीकडे बँड वाजतोय आणि कुत्रा त्याचा आनंद लुटताना दिसत आहे. Buitengebieden या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच चला नाचुया अशी पोस्टदेखील लिहिली आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी लिहिपर्यंत ट्विटरवर १६९ हजारांहून अधिक युजर्संनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याच वेळी १० हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी त्याला लाइक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कुत्र्यांच्या डान्स परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The dog dances to the beat of the band video viral rmt

ताज्या बातम्या