सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपंल मनोरंजन करतात तर काही आपणाला भावूक करतात तर काही व्हिडीओ असे असतात ते आपणाला थक्क करतात. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला अशरक्ष: मृत्यूच्या दारातून परत आल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- भररस्त्यात बाईक पार्क केलेली दिसताच हत्ती धावत आला अन्…, Video शेअर करत वाहतूक पोलिसांनी समजावला नियम

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video

देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात आणि मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो, असेही म्हटलं जातं. याचेच एक ताजे उदाहरण उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये पाहायला मिळालं आहे. कारण एका तरुणानाच्या तत्परतेमुळे एक महिलेला ट्रकच्या टायरखाली जाण्यापासून वाचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रतापगडमधील एमजी रोडवरील आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये ट्रकच्या टायरखाली जाणाऱ्या महिलेचा जीव वाचवून तरुणाने शौर्य आणि माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. रस्ता अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा- Video: कपड्यांमुळे निर्दयी जमावाची मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण, म्हणाले “असे कपडे पुरुषांना…”

व्हिडीओमध्ये, एक महिला स्कुटीवरून जात असताना ती रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ती स्कुटीसह रस्त्यावर ट्रकच्या मधोमध भागात पडते. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या तरुणाचे लक्ष त्या महिलेकडे जाते आणि तो क्षणात महिलेला बाजूला ओढतो, ज्यामुळे ती ट्रकच्या मागील चाकाखाली जाण्यापासून बचावते. शिवाय याचवेळी ट्रक ड्रायव्हरही अचानक ट्रक थांबवल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

तरुणावर कौतुकाचा वर्षाव –

दरम्यान, या थरारक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या तरुणाचे खूप कौतुक करत आहेत. शिवाय व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही सेकंदांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्यासह मोठी वाहने ओव्हरटेक करताना सावधगिरी बाळगणे किती गरजेच आहे. हाच धडा या व्हिडीओतून मिळत आहे.