scorecardresearch

Viral Video: पिसाळलेला वाघ वाऱ्यासारखा धावला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर पंजा मारला, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

डरकाळी फोडून वाघ सुसाट निघाला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर हल्ला केला, पाहा थरारक व्हिडीओ.

Viral Video: पिसाळलेला वाघ वाऱ्यासारखा धावला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर पंजा मारला, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल
वाघाच्या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला. (image-twitter)

Tiger attacked a man viral video: सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. पण वाघाच्या हल्ल्याचा एक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हत्तीसोबत जंगल सफारीला निघालेल्या माहूतावर वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या वाघाने मोठी झेप घेतली. वाघाचा हा थरार कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. वाघाने केलेल्या या हल्ल्याचा हा व्हिडीओ जुना आहे. पण नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पाहण्यासाठी जबरदस्त प्रतिसाद दिल्याने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने शेअर करण्यात आला आहे.

वाघाने डरकाळी फोडली अन् सुसाट हत्तीच्या दिशेेनं धावला, त्यानंतर…

अनेकांच्या अंगावर शहारा आणणारा या व्हिडीओत काही जण हत्तीवर बसून जंगल सफारी करताना दिसत आहेत. याचदरम्यान एक वाघ शेतातील गवतातून भरधाव वेगानं हत्तीच्या दिशेनं येताना दिसतो. हा वाघ हत्तीवर बसलेल्या माहुताची शिकार करण्यासाठी मोठी झेप घेतो. वाघ पंजा मारत असताना माहुत काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी वाघ उंच झेप घेऊन माहुतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. वाघाने केलेला हा खतरनाक हल्ला कॅमेराबद्ध झाल्याने व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – Viral Video: धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला हातरुमालाच्या खेळात फुटला घाम, या तरुणीनं केला दारुण पराभव

इथे पाहा व्हिडीओ

@weirdterrifying या नावाच्या युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळपास १.७ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर २९ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. १३ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमिन सरकल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. वाघाने प्राण्यांवर हल्ला केल्याचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. पण थेट माणसावर वाघाने हल्ला केल्याचे व्हिडीओ क्वचितच इंटरनेटवर पाहायला मिळतात. कारण वाघापासून चार हात लांबण राहण्यासाठी अनेक जण योग्य ती काळजी घेतात. पण तरीही रानावनात भटकणारा वाघ मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ला करतो, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 18:26 IST

संबंधित बातम्या