Tokyo Olympic : खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी भारताचं स्पेशल ऑलम्पिक अँथम!

२३ जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मोहित चौहान यांनी संगीतबद्ध केलेल्या भारतीय ऑलिम्पिक अँथमचे लोकार्पण केले.

Indian Olympic Anthem
प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी बनवलं ऑलम्पिक अँथम

येत्या २ जुलैपासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये १०० हून अधिक अॅथलिट्स भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा आहे. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे मागील वर्षीचे गेम्स पुढे ढकलण्यात आले होते. यंदा ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो येथे पार पडणार आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी बुधवारी २३ जून अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनाच्या दिवशी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय युवा ऑलिम्पिक संघाचे अधिकृत अँथम लाँच केले. यावेळी आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता हे सुद्धा उपस्थित होते.

असं तयार झालं ऑलिम्पिक अँथम…

हजारो लोकांनी बघितलेलं हे ऑलम्पिक अँथम पार्श्वगायक मोहित चौहान यांनी गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे. मोहित चौहान हा भारतीय प्लेबॅक सिंगर आहे. बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांसाठी तो ओळखला जातो. त्याने भारतीय चित्रपटांसाठी आणि इतर भाषांमध्ये अल्बमची अनेक गाणी रेकॉर्ड केली आहेत. तो भारतातील सर्वात प्रसिद्ध इंडी-पॉप गायक आहे. मोहितने त्याच्या या गाण्याची माहिती ट्विटरवर शेअर करत सगळ्यांना दिली. तो ट्वीट करताना लिहतो “माझं ‘तू ठाण ले’ हे ऑफिशल ऑलम्पिक अँथम भारतीय ऑलम्पिक टीमसाठी बनवलं आहे. हे गाणं शेअर करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे”!

टोकियोमध्ये होणाऱ्या गेम्सचे प्रशिक्षण जोरात सुरू आहे. स्पर्धक दिवसरात्र मेहनत घेत जास्तीत जास्त पदकं मिळवण्याच्या तयारीत आहेत. २०१६ साली रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमधील पदकांपेक्षा भारत जास्त पदके जिंकेल असा विश्वास रिजिजू यांना आहे. तथापि, खेळाडूंनी प्रचंड दबावाखाली न येता, पदक जिंकण्यात अपयशी ठरल्यास निराश होऊ नये, असेही मंत्री म्हणाले. तसेच त्यांनी ‘ऑलिम्पिक की आशा’  या टोकियोला जाणाऱ्या अॅथलिट्सच्या जीवनावर बनविलेल्या चित्रपटांच्या मालिकेबद्दलही सांगितले. भारतीय टीमविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या चाहत्या वर्गाला यातून माहिती मिळेल. ही चित्रपट मालिका चित्रपट आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympic indian official anthem mohit chauhan ttg

ताज्या बातम्या