अनेकदा रस्त्यावर विचित्र अपघात पाहायला मिळतात पण अमेरिकेच्या महामार्गावर घडलेला अपघात मात्र किळस वाटणारा आणि अनेकांची झोप उडवणारा ठरला असेल हे नक्की. जवळपास साडेतीन हजार किलो ईल माशांना घेऊन एक ट्रक निघाला होता. पण ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. या अपघातादरम्यान ट्रकमध्ये असणारे ईल मासे रस्त्यावर पडले. हे मासे दिसायला सापासारखे दिसतात. जेव्हा हे मासे विचित्र परिस्थितीत सापडतात तेव्हा ते चिकट पदार्थ स्त्रवतात.

Kashmiri Militants: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

अपघात झाल्यानंतर असंच काहीसं झालं. हे सारे मासे रस्त्यावर पडले आणि पांढरा चिकट पदार्थ माशांबरोबर रस्त्यावर पसरला. हा विचित्र अपघात पाहून अनेकांना अक्षरश: किळस वाटली. हे मासे रस्त्यावरून साफ करेपर्यंत पोलिसांच्या नाकी नऊ आले.  काही दिवसांपूर्वी व्हिएन्नाच्या रस्त्यावर असाच विचित्र अपघात घडला. कोंबड्यांना घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटला. ट्रक उलटल्याने ट्रकच्या आतमध्ये असणारे शेकडो लहान पिंजरे रस्त्यावर पडले. यात जिवंत कोंबड्या होत्या. ट्रक रस्त्यावर उलटल्यानंतर अनेक पिंजऱ्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला. मात्र, काही कोंबड्या यावेळी पिंजऱ्यातून बाहेर आल्या. त्यानंतर या कोंबड्यांना महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण केला. रस्त्यावर सर्वत्र कोंबड्या फिरत असल्याने या ठिकाणी वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजले होते. या ट्रकमध्ये जवळपास सात हजारांहून अधिक कोंबड्या होत्या.

ट्रम्प यांच्या त्या वाक्यानं फ्रान्सच्या फर्स्ट लेडीही झाल्या खजील!