किकी चॅलेंज सगळीकडेच धुमाकूळ घालत आहे. या चॅलेंजपायी अनेकांनी आपले जीव धोक्यात घातले आहेत. पोलिसांची डोके दुखी ठरत चाललेलं हे किकी चॅलेंज न करण्याचं आवाहन अनेकांनी केलं आहे. मात्र तेलंगनामधल्या दोन शेतकऱ्यांनी पूर्ण केलेलं किकी चॅलेंज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

ड्रेकच्या स्कॉर्पियन अल्बममधील ‘किकी डु यू लव्ह’ मी या गाण्यावरील स्टेप्स चालत्या गाडीतून बाहेर येऊन करायच्या. या स्टेप्स पूर्ण झाल्या की पुन्हा गाडीत जाऊन बसायचं असा हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. म्हणूनच अशा प्रकारचं स्टंट न करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र तेलंगनामधल्या गिला आणि पिल्ली या दोन शेतकऱ्यांनी खास देसी स्टाईलनं विशेष म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात न घालता हे चॅलेंज पूर्ण केलं आहे म्हणूनच या चॅलेंजची सगळीकडेच चर्चा होताना दिसत आहे.
गिला २४ तर पिल्ली २८ वर्षांचा आहे. शेतात नांगरणी करत असताना त्यानं हे किकी चॅलेंज पूर्ण केलं. त्यामुळे त्याच्या चॅलेंजचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. आतापर्यंत नांगर चालवताना कोणीही हे चॅलेंज पूर्ण केलं नव्हतं त्यामुळे ‘देसी बॉईज’चं चॅलेंज सगळ्यांनाच आवडत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या दोघांचा व्हिडिओ पाहून त्यांचं कौतुक केलं आहे.

या गावात अजूनही लोक इंटरनेटच्या वापराला सरसावले नाही ‘आमची मुलं रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालीत याचा आम्हाला आनंद झाला’ असं सांगत त्याच्या आईवडिलांची आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीराम श्रीकांत यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर केला होता आणि अल्पावधितच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अभिनेता विवेक ओबेरॉय यानंही या व्हिडिओ ट्विट करत या दोघांचं कौतुक केलं आहे. हे खरं सुरिक्षित किकी चॅलेंज आहे असं त्यानं व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे.