ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या साध्या, सरळ स्वभावासाठी आणि राहणीमानामुळे जगभर प्रसिद्ध आहेत. कधी ते त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी ते कार्यपद्धतीमुळेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. अशात ब्रिटिश पंतप्रधानांचा त्यांच्या घराबाहेरील नेदरलँडचे पंतप्रधानांबरोबरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यात ऋषी सुनक स्वतःच्याच घरासमोर काही सेकंद थांबावे लागल्याने अस्वस्थ झाल्याचे दिसत आहेत. यावेळी नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषी सुनक नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्या स्वागतासाठी आपल्या (10 डाउनिंग स्ट्रीट) घराबाहेर आले, ते घराबाहेर पडताच त्यांच्या घराचा दरवाजा अचानक आतून लॉक झाला. या परिस्थितीने सुनक काहीवेळ अस्वस्थ झाले. सुनक यांनी मार्क रुटे यांचे स्वागत केले आणि दोघेही काही सेकंद प्रसारमाध्यमांसमोर थांबले. पण, त्यानंतरही दरवाजा उघडला गेला नाही. यावेळी प्रसारमाध्यमे सर्व गोष्टी कव्हर करत होते, त्यामुळे दोघांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षात झाले असे की, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक बुधवारी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या 10 डाउनिंग स्ट्रीट या घराबाहेर आले. ऋषी सुनक बाहेर पडताच त्यांच्या घराचा दरवाजा आतून लॉक झाला. यावेळी ऋषी सुनक यांनी मार्क रुटे यांना हस्तांदोलन करत मीडियासमोर पोज दिल्या. दरम्यान, घराचा दरवाजा आतून लॉक झाल्याने सुनक आणि रुटे दोघांनाही काही सेकंद घराबाहेरच थांबावे लागले. ही परिस्थिती सुनक यांच्यासाठी खूपच अस्वस्थ करणारी होती. शेवटी दोघे घराच्या दिशेन चेहरा करून गप्पा मारत उभे राहिले. यावेळी ऋषी सुनक यांनी घराचा दरवाजाही ठोठवला, पण तरीही दरवाजा उघडला गेला नाही. यामुळे दोघेही गोंधळून गेले, दोन्ही नेत्यांनी शेवटी खिडकीतून घरातील लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, या अशा स्थितीत मीडियाने त्यांना टोचणे सुरू केले होते. अखेर काही मिनिटांनी त्यांच्या घराच्या एका सुरक्षा रक्षकाने दरवाजा आतून उघडला. दरम्यान, हे तांत्रिक समस्येमुळे झाल्याचे सांगण्यात आले.

सुनक आणि रुटे यांनी आपल्या भेटीत मध्य पूर्व, युक्रेन आणि बेकायदेशीर स्थलांतर यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सुनक आणि रुटे यांची भेट तासाभराहून अधिक काळ चालली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk pm rishi sunak dutch pm gets locked out of 10 downing street home watch viral video sjr