बस्तरच्या नक्षलग्रस्त भागात एकदा गेले की जिवंत परतण्याची शक्यता धुसर, सतत नक्षलवादीयांसोबत सीआरपीएफ जवानांची चमकम सुरू असते. रस्त्यात कुठे सुरंग पेरलेले असतात तर कधी छुपे हल्ले होण्याची शक्यता असते अशा वेळी जिवंत परण्याची शाश्वती नसते. पण या बस्तरच्या भागात पहिल्यांदाच एका महिलेची CRPF अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचा : अफगाणच्या पहिल्या वैमानिकेने मागितला अमेरिकेकडे आश्रय

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
Fungible FSI scam, mhada
म्हाडातील फंजीबल चटईक्षेत्रफळ घोटाळा; आतापर्यंत मंजूर प्रस्तावांची छाननी होणार
austrelian
भारतातील निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी ऑस्ट्रेलियन पत्रकाराला नाकारली? सरकारने स्पष्ट केली भूमिका
Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही

हरियाणाच्या उषा किरण हिची नक्षल प्रभावित बस्तर भागात नियुक्ती करण्यात आली. या भागात CRPF जवान म्हणून आलेली उषा किरण ही पहिली महिला आहे. ३३२ महिला बटालियनच्या नियुक्तीवेळी तिने बस्तरची सेवेसाठी निवड केली. खरतर या नक्षलग्रस्त भागात एका महिलेने काम करणे धोक्याचे आहे. पण  वडिलांपासून प्रेरणा घेत आपण या भागात सेवा करण्याचे ठरवले असे तिने सांगितले. उषाचे वडिल देखील CRPF जवान आहेत. तर तिचे आजोबा देखील CRPF जवान होते.

वाचा : भाजीवालीचा उपक्रम, घरात शौचालय दाखवा आणि १ किलो टोमॅटो मोफत मिळवा

बस्तरच्या भागातील एक अनुभव देखील तिने सांगितला. बस्तरमध्ये पहिल्यांदा महिलेची CRPF जवान म्हणून नियुक्ती झाल्याचे कळताच इथल्या महिलांनी आपले उत्साहात स्वागत केले असेही तिने सांगितले.