आपल्या गावातील जवळपास अर्ध्याधिक घरात शौचालय नाही हे समजल्यावर एका भाजीवालीने शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. घरात शौचालय दाखवा आणि एक किलो टोमॅटो मोफत मिळवा असा नवा उपक्रम तिने सुरू केला. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाने तिला पूर्णपणे झपाटून टाकले आहे म्हणूनच गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी आणि घराघरात शौचालय बांधावे यासाठी ती जनजागृती करत आहे.

वाचा : ‘मी हनुमान आणि मोदी श्रीराम’, हनुमानाच्या रुपात मोदी भक्त पोहोचला रॅलीत

गंगावती तालुक्यातील दानापुर गावात शरण्णा नावाची महिला टोमॅटो विक्री करते. त्यांच्या गावात जवळपास १३०० कुटुंब आहेत. त्यातील ५०० हून अधिक घरात शौचालयच नाहीत. हे जेव्हा शरण्णा यांना कळले तेव्हा त्यांनी घराघरात जाऊन शौचालयाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायला सुरूवात केली. आपल्या गावातील प्रत्येक घरात शौचालय असले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणल्या की मी मोदींची भक्त आहे. मोदींच्या स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत आपण गावक-यांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या भाजी विकत आहेत.

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

आतापर्यंत त्यांनी ३०० किलोहून अधिक टोमॅटोंचे मोफत वाटप केले आहे. ज्या घरात शौचालय आहे त्यांना शरण्णा १ किलो टोमॅटो मोफत देतात. जोपर्यंत गावात आपण जनजागृती करण्यास पूर्णपणे यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण टोमॅटोंचे मोफत वाटप करु असेही त्यांनी सांगितले.