वाहतूकीचे नियम वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीच बनवलेले असतात. वाहनचालकांनी या वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केलं तर वाहनधारकांसह रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांचेही संरक्षण होते. शिवाय प्रवास करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, कोणाला दुखापत होऊ नये हाच उद्देश वाहतूक नियम बनवण्यामागे असतो. मात्र तरिदेखील अनेक वाहनचालक हे नियम न पाळता गाड्या चालवत असल्याचं आपणाला दिसतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मग कोणी महामार्गावर वाहनांची लेन पाळत नाही, तर कोणी शहरातून गाडी चालवताना डोक्याला हेल्मेट घालत नाही. अशा अनेक नियमांना लोकं गंभीरपणे घेत नाहीत. लोकांनी हे नियम पाळावे म्हणून मग वाहतूक पोलिस अशा नियम न पाळणाऱ्या लोकांकडून दंड आकारतात. त्याचे चलन कट करुन काय असेल तो आर्थिक दंड भरायला लावतात. पैसे जाण्याच्या भितीने का होईना लोकांनी नियम पाळावे, असा हेतू पोलिसांचा असतो.

हेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्

मात्र, काही पोलिस विनाकारण नियमाच्या नावाखाली नागरिकांना त्रास दिल्याचंही आपण पाहिलं आहे. तर काही पोलिस नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे म्हणून प्रामाणिकपणे काम करत असतात. सध्या अशाच एका प्रामाणिक वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील ट्रफिक पोलिस सुनिल दत्त दूबे यांचा असून, ते नागरिकांना हात जोडून हेल्मेट घालण्याची विनंती करताना दिसतं आहेत. शिवाय चलन देऊ नका फक्त स्वत:ची काळजी घ्या असंही ते नागरिकांना सांगत आहेत.

पोलिसांचं होत आहे कौतुक –

महाराजगंज शहरात ‘नो हेल्मेट नो एंट्री’ मोहिमेअंतर्गत हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना थांबवण्यात येत होतं. यादरम्यान, एक महिला आपल्या दुचाकीवरुन हेल्मेट न घालता रस्त्यावरून जात होती. या वेळी हेल्मेट नसणाऱ्यांना महिलेचं हात जोडत दूबे यांनी स्वागत केलं आणि हेल्मेट घालण्याबाबत तिला जागरुक केलं. शिवाय पोलिसांनी दंड न आकारता केवळ नम्रपणे हेल्मेट घालायची विनंती केल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh police is requesting to wear helmet with folded hands instead of challan jap
First published on: 08-12-2022 at 21:03 IST