Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तामिळनाडूतील तिरुमंगलमजवळ शिवराकोट्टई येथील विरुधुनगर-मदुराई महामार्गावर बुधवारी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कुटुंबातील चार सदस्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.हा भीषण रस्ता अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल…

मिळालेल्या माहितीनुसार विलापुरम येथील मणी नावाचा एक व्यक्ती ही कार चालवत होता. त्याची पत्नी नागजोथी, त्यांची ८ वर्षांची मुलगी आणि आई-वडील कानगवेल आणि कृष्णवेणी यांच्यासह मदुराईला जात असताना ही घटना घडली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अपघातात पांढऱ्या रंगाची कार आधी दुभाजकाला धडकली आणि नंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या ५३ वर्षीय दुचाकी चालकाला धडकली. त्यानंतर ती महामार्गाच्या पलीकडे असलेल्या सर्व्हिस रोडवर उलटली.

Jugaad Video
Jugaad Video : फक्त एका कांद्याच्या मदतीने घरातील डास पळवा, पाहा हा सोपा जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल
Accident Shocking Video
पाठीमागून मृत्यू आला अन्…अचानक रस्त्यावर थरारक अपघात; पण चूक कुणाची? VIDEO पाहून चक्रावून जाल
an old man doing pushups
VIDEO : नाद पाहिजे! डोक्यावर टोपी, पांढरा शुभ्र सदरा अन् पायजमा; आजोबांनी मारले पुशअप्स, पाहा व्हिडीओ
a groom pick up ghoonghant of bride
VIDEO : नवरीच्या चेहऱ्यावरील घूंघट उचलताच नवरदेव गेला कोमात, नेमकं काय पाहिलं ? व्हिडीओ होतोय व्हायरल
food making machine
महिलांनो, आता भाजी बनविण्याची झंझट संपली! बाजारात आली स्वयंपाक बनविणारी मशीन, Video पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
csk vs pbks selfish ms dhoni sends back daryl mitchell slammed for denying single ipl 2024
“धोनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, स्वार्थी…”, PBKS vs CSK सामन्यातील धोनीच्या त्या कृतीवर भडकले चाहते, पाहा VIDEO
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड

दुर्दैवाने, यामध्ये कार चालकाची पत्नी, आई-वडिल आणि दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक आणि त्याची मुलगी बचावली आहे. यावेळी जखमी कारचालक आणि मुलीला राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तरुणीची प्रकृती गंभीर आहे.हे कुटुंब थलवाईपुरम येथून मंदिरातील उत्सवात सहभागी होऊन परतत होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.