सहा वर्षाच्या मुलाच्या छातीवर लाथ मारल्यामुळे केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मुलाची चूक केवळ हीच होती की तो या इसमाच्या गाडीला टेकून उभा राहिला होता. या गोष्टीचा राग आल्याने या व्यक्तीने अतिशय निर्दयी पद्धतीने मुलाच्या छातीत लाथ मारली. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

एका गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला एक पांढरी कार उभी होती. एक लहान मुलगा या गाडीला टेकून उभा होता. याचवेळी गाडीचा मालक बाहेर आला आणि त्याने या मुलाला गाडीला टेकलेले पाहिले. मुलगा आपल्या गाडीला टेकलेला आहे हे पाहून या व्यक्तीला राग अनावर झाला आणि त्याने मुलाला लाथ मारली. यानंतर हा मुलगा गुपचूप तिथून निघून जाऊ लागला. गाडीचा मालकही गाडीजवळ गेला. मात्र घडलेली घटना पाहून आजूबाजूच्या लोकांनी लगेचच गाडीकडे धाव घेतली.

police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान Black Belt राहुल गांधींनी दिल्या खास कराटे टिप्स; भाजपाला लक्ष्य करत म्हणाले, “टेक्निक चुकीची असेल तर…”

आजूबाजूला असलेल्या स्थानिकांनी गाडीला घेरले आणि आरोपीला त्याने केलेल्या कृतीचा जाब विचारू लागले. आरोपीने मात्र तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. कारचालकाचे नाव शिहशाद असून तो किपोन्नयामपालम येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पीडित लहान मुलगा राजस्थानच्या एका श्रमिक कुटुंबाचा सदस्य आहे.

विमानातून प्रवास करणं प्रवाशाला चांगलंच महागात पडलं; सुटकेसची अवस्थापाहून तुम्हालाही फुटेल घाम

पेशाने वकील असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने रात्री साडे आठच्या सुमारास पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिहशादला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले, मात्र नंतर त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले.