UPSC Result 2023-24 : असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि विश्वास असेल तर तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही यशाचे शिखर गाठू शकता. नुकताच यूपीएससीचा निकाल जाहिर करण्यात आलाय. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने टॉप केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा २०२३ चा हा अंतिम निकाल जाहीर केला आहे. तर याच परिक्षेत उत्तर प्रदेशातील पवन कुमारनंही यूपीएससीमध्ये २३९ वा क्रमांक मिळाला आहे. महागडी पुस्तकं किंवा खासगी कोचिंग परवडत नव्हतं, पण तरीही त्यांनी यूपीएससीमध्ये यश मिळवलं. मातीचे घरात राहून रात्रीचा दिवस करणाऱ्या पवन यांच्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिस्थितीचे भांडवल न करता यश खेचून आणणाऱ्या पवन कुमार यांचा संघर्ष कौतुकास्पद आहे.

यूपीएससीमध्ये २३९ वा क्रमांक मिळवणाऱ्या पवन कुमार यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. पवन यांच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. पवन कुमार दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करत होते. मात्र त्यांची घरची परिस्थिती फारट बिकट आहे. त्यांच्या घराचा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. अशा परिस्थितीत त्यांनी मिळवलेलं यश पाहून सोशल मीडियावर लोक त्यांचे खूप कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पवन कुमार यांच घर मातीचं असून एक पॅस्टिकचा कागद त्यावर टाकला आहे. अशा घरात त्यांचं कुटुंब राहतं. पवन कुमार यांचा निकाल ऐकून त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

घराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

पवन कुमार यांचे वडील शेतकरी असून त्यांची आई गृहिणी आहे. तर त्यांन तीन बहिणी आहेत. पवन यांनी २०१७ मध्ये नवोदय स्कूलमधून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली होती. इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अलाहाबाद येथून बी.ए. त्यानंतर पवन कुमार यांनी दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर पवन यांनी तिसऱ्या प्रयत्नात ही बाजी मारली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स

सर्वजण पवन यांचं अभिनंदन करत आहे. पवनच्या या यशामागे त्याचा आत्मविश्वास आणि जिद्द आहे. पवनपासून अनेकांना आता प्रेरणा मिळाली आहे.