घरात चिमुकला पाहुणा येणार म्हटले, की घरात उत्साह असतो. बाळाच्या आगमनापूर्वी आईचे सर्व हट्ट, लाड पुरवले जातात. ओटभरणी, बेबी शॉवर, असे अनेक कार्यक्रम आवर्जून करण्यात येतात. तसेच हे बाळ जन्माला येते तेव्हा आनंदाने पेढे, तर चिमुकल्यांच्या स्वागतासाठी घरही सुंदर रीतीने सजविण्यात येते. तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. एका कुटुंबाने बाळाच्या आगमनासाठी काहीतरी खास केले आहे.

नोएडा येथील एका कुटुंबाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. इथे एका कुटुंबाच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बदलत्या काळानुसार आता मुलगा असो किंवा मुलगी तिच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते. तर आज एका कुटुंबात एका चिमुकलीचे आगमन झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि म्हणूनच त्यांनी पूर्ण सोसायटीमध्ये फुग्यांची सजावट केली आहे. एकदा पाहा ही व्हायरल पोस्ट.

हेही वाचा…Leap Year 2024: दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाचे महत्त्व काय? ‘ते’ कसे ओळखले जाते? जाणून घ्या

पोस्ट नक्की बघा :

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिले असेल की, एका कुटुंबाने त्यांच्या बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण सोसायटीला गुलाबी फुग्यांनी सजवण्यात आले आहे. तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुग्यांची माळ लावून सजावट करण्यात आली आहे. हे पाहून तेथील एका महिला रहिवासी व्यक्तीने या क्षणाचा एक फोटो शेअर केला आणि कौतुक करीत पोस्ट शेअर केली.

सोशल मीडियावर ही पोस्ट @Supriyyaaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. “जेव्हा एक मुलगी जन्माला येते”, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून हृदयस्पर्शी कमेंट्स करताना पोस्टखाली दिसून आले आहेत. तसेच या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली आहेत.