निसर्ग नेहमीच अविष्काराचा चमत्कार दाखवून मानवाला चकित करतो, याचा अंदाज हा व्हिडीओ पाहून लावता येतो. अनेकवेळा अशा गोष्टी कॅमेऱ्यात कैद होतात, ज्या पाहून आश्चर्यही वाटतं आणि आनंदही होतो. असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ सेरेनगेटी नॅशनल पार्क टांझानियाचा आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे आणि लोकांची याला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळतेय. या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाचा झेब्रा दिसत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आजपर्यंत तुम्ही फक्त काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांसाठी प्रसिद्ध झेब्राच पाहिले असतील, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. खरं तर, या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाचा झेब्रा दिसत आहे, जो सोशल मीडियावर पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष बाब म्हणजे टांझानियातील सेरेनगेटी नॅशनल पार्कच्या या व्हिडीओमध्ये दिसणारा पांढऱ्या रंगाचा झेब्रा जर तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला त्याच्या शरीरावर पांढरे पट्टे दिसतील. पण ते पट्टे खूपच हलके आहेत.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

आणखी वाचा : अर्रर्र खतरनाक! सापाला ओंजळीने पाजतोय पाणी ; VIRAL VIDEO पाहून नेटकरी हैराण

हा झेब्रा (अल्बिनो झेब्रा व्हायरल व्हिडीओ) अल्बिनो आहे. तुमच्या माहितीसाठी, अल्बिनो ही शरीरावर उद्भवणारी स्थिती आहे. असे मानले जाते की, अशा स्थितीत शरीराचा मूळ रंग (मेलॅनिन) उडून जातो, ज्यामुळे शरीर पांढरे होते. प्राण्यांमध्ये ही काही नवीन गोष्ट नाही. ही प्रतिक्रिया मानवांमध्ये देखील दिसू शकते, ज्याला पांढरे ठिपके म्हणतात. याआधीही पांढरे वाघ, पांढरे सिंह आणि पांढरे मगर पाहिले गेले आहेत, ज्याचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर सहज पाहायला मिळतील.

या व्हिडीओमध्ये एक लहान झेब्रा इतर सामान्य झेब्रांसोबत दिसत आहे. सेरेनगेटी नॅशनल पार्कने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये या पांढऱ्या झेब्राचे नाव नदसियाता असल्याचे सांगितले आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘सेरेनगेटी करिश्माची भूमी आहे’. आतापर्यंत १ हजार ८५२ लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.