Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हिंस्र प्राणी शिकार करताना दिसतात. अनेकदा मगरीचेदेखील बरेच व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यात पाण्यात लपलेल्या मगरी प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सध्या अशाच एका मगरीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जी चक्क रस्त्यावर उतरलेली दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बुलंसदहर येथील असून ही मगर बुधवारी सकाळी येथे दिसून आली. ही मगर १० फूट लांबीची असून गंगा नदीच्या पात्रातून बाहेर आली होती व ती पुन्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगवरून नदीच्या पात्रात जाण्याचा प्रयत्न करत होती. पण, त्यावेळी तिला नदीच्या पात्रात जाण्यात अपयश आले. त्यामुळे ती जमिनीवरच बराच वेळ फिरत होती. त्यानंतर तिला वन अधिकाऱ्यांनी नदीच्या पात्रात सुखरूप सोडले.

हेही वाचा: शेवटी भूक महत्त्वाची; बिबट्याने हुशारीने रानडुकराचा केला पाठलाग अन् पुढच्या १० सेकंदात जे घडलं ते…VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ येथील एका नागरिकाने शूट केला असून सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @Shivaji Mishra या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या व्यक्तीने “बुलंदशहर जिल्ह्यातील नरोरा येथील गंगानाहरमधून ही मगर बाहेर आली, वनविभागाच्या पथकाने पोहोचून तिची सुटका करून पुन्हा कालव्यात सोडली”, असे म्हटले आहे.

हेही वाचा: याला म्हणतात डान्स, वरातीत मित्रांना पाहून नवरदेव झाला बेभान; गाडीतून मारली उडी अन् केलं असं काही… VIDEO पाहून माराल कपाळावर हात

त्यानंतर @Aviral Singh या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात मगरीला नदीच्या पात्रात सोडण्यासाठी काही लोक मदत करताना दिसत आहेत. यावेळी मगरीच्या तोंडाला आणि हाता-पायाला दोरी बांधल्याचे दिसत आहे.