scorecardresearch

OMG! मगरीने चक्क व्यक्तीच्या अंगावरच उडी घेतली, अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

मगर (crocodile)… जी वाघ, सिंह, बिबट्या अशा प्राण्यांनाही एकाच घटकेत संपवते. जिथं हिंस्र प्राण्यांचंही चालत नाही तिथं माणसांची काय बिशाद. एका माणसाच्या अंगावर चढलेल्या या मगरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पुढे काय झालं पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

alligator-jumps-on-man
(Photo: Instagram/ jayprehistoricpets)

मगर… जी वाघ, सिंह, बिबट्या अशा प्राण्यांनाही एकाच घटकेत संपवते. एखाद्या गावात अशी मगर दिसली की लोकांमध्ये दहशत निर्माण होते आणि अशी भीती असणंही साहजिकच आहे. जिथं हिंस्र प्राण्यांचंही चालत नाही तिथं माणसांची काय बिशाद. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महाकाय मगर अचानक एका व्यक्तींच्या अंगावर चढते आणि त्याला आपल्या वजनाने चिरडण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच उभा राहतो. पुढे नक्की काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हायरल व्हिडीओमधल्या महाकाय मगरीला पाहता तिचं वजन काय असेल याचा अंदाज येतो. इतकी मोठी ही मगर या व्यक्तीच्या अंगावर चढली आणि इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीला ती चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करतेय, हे पाहून व्यक्तीची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना देखील करवत नाही. मगर पाण्यात जितकी आक्रमक असते तितकीच ती जमिनीवर सुद्धा आक्रमक असते. मगर आपल्या मजबूत जबड्याने शिकार पकडते, त्यावर हल्ला करते. पण अनेकदा मगर अशा प्राण्यावरही हल्ला, जो अतिशय ताकदवान असतो.

आणखी वाचा : Viral Video : शर्यतीच्या सुरूवातीलाच पडला, पण शेवटी त्याने जे केलं ते पाहून तुम्ही म्हणाल “वाह, क्या बात!”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महाकाय मगर एका व्यक्तीच्या अंगावर चढलेली आहे. या व्यक्तीच्या अंगावर पायांनी हालचाल करत तिला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहताना ही मगर आता काही मिनिटांत या व्यक्तीचा खेळ खल्लास करेल, अशी मनात भीती निर्माण होते. ही महाकाय मगर आपल्या वजनाने या व्यक्तीला चिरडून टाकेल, अशी कल्पना करतानाच अंगावर काटा येतो. पण या व्हिडीओमध्ये एक वेगळं चित्र दिसून आलं. ही मगर त्या व्यक्तीच्या अंगावर चढली आणि त्याला चिरडून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती. पण ती नेहमीप्रमाणे आपल्या जबड्याने त्या व्यक्तीची शिकार करताना किंवा त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत करताना दिसून आली नाही. त्यामुळे मनात भीती असताना लोकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला.

आणखी वाचा : मालकीणीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून मांजरीने काय शक्कल लढवली, पाहा VIRAL VIDEO

खरं तर हा व्हिडीओ पाहताना पहिल्या नजरेत असं दिसतं की, मगर त्या व्यक्तीला कच्च चावून खाईल. पण हा व्हिडीओ आणखी निरखून पाहिला तर हा व्हिडीओ एका वन्यजीव अभयारण्यातला असल्याचं दिसून येतं. ही मगर पाळलेली असून ती आपल्या केअर टेकरसोबत मस्ती करताना दिसत आहे.

आणखी वाचा : जंगलाचा राजा सिंहाची म्हशींनी केली दयनीय अवस्था! बघा Viral Video

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Photo : बाईकच्या नंबरप्लेटवर लिहिलं ‘आमदाराचा नातू’; एमआर गांधी यांच्याशी संबंध

या मगरीचे वर्तन कळू शकलेलं नाही, त्यामुळे केव्हाही हल्ला होण्याची शक्यता होती. म्हणूनच मगरीसोबत मस्ती करताना तिचा जबडा एका टेपनं बंद करण्यात आलं आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला सोशल मीडियावर १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर एक लाखाहून अधिक यूजर्सनी त्याला लाईक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video alligator jumps on man jay brewer magarmach crocodile attack prp

ताज्या बातम्या