आपण दररोज खूप व्यायाम करतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर या लहान बाळाचा व्हिडिओ पाहा. मग तुम्ही करत असलेला वर्कआऊटची तुम्हालाच लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या दोन वर्षांचे असणारे हे बाळ काय करतेय पाहून तुम्हीही थक्क व्हाल. किली नावाच्या या मुलीचा व्हिडिओ इंटरनेटवर धमाल उडवत आहे.

नेटीझन्सकडून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून या व्हिडिओचे नावही ‘बर्पी वर्कआऊट करणारे बाळ परत आलेय’ असं आहे. हे बाळ उन्हाळा असल्याने आपल्या आईसोबत स्विमिंगपूलवर गेले आहे. कडक उन्हाळा असल्याने ते पाण्यात डुबक्या घेत आहे. त्याचबरोबर पूलच्या कडेला येऊन वर्कआऊटही करत आहे. एकदा नाही तर अनेकदा हा व्यायाम किलीने केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून त्याला हजारोंनी ह्यूव आणि कमेंटस मिळाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BWdkJIFAV_z/

किलीची आई फिटनेस ब्लॉगर असून तिने आपल्या बाळाचा स्विमिंगपूलवर व्यायाम करतानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. इतकेच नाही तर किली हे सगळे अतिशय आनंदाने करताना दिसत आहे. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या या गोंडस बाळाला व्यायाम करताना पाहून तुम्हालाही व्यायाम करण्याचे नक्कीच प्रोत्साहन मिळेल.