viral video: दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही लोकांना भावनिक करतात. आईचं प्रेम काय असतं आणि आईच्या प्रेमात किती ताकद असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही मातृप्रेम असतं. एखाद्या प्राण्याच्या पिल्लाकडे माणसानं बघीतलं तरी ते प्राणी आपल्यावर धावून येतात..या प्राण्यांमधलं प्रेम पाहून कधी कधी आपल्याचं डोळ्यात पाणी येत. असाच एक डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांना भावनिक करतो आहे..चिंपांझी हा सर्वात बुद्धीमान प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या प्राण्याच्या कित्येक सवयी हुबेहुब माणसांसारख्याच असतात. त्याच्या हालचाली, त्याचं खाणं-पिणं, वागणं माणसांसारखंच असतं. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील मान्य कराल, खरंच प्राण्यांना देखील माणसांसारख्याच भावना असतात.

आई आणि बाळाचं पुनर्मिलन

या व्हिडीओमध्ये एका चिंपांझीने एका बाळाला जन्म दिला आणि काही वेळातच, पशुवैद्यकीय डॉक्टर त्याला काही वैद्यकीय उपचारांसाठी घेऊन गेले. चिंपाझीच्या आईने असे गृहीत धरले की तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बाळाला घेऊन गेले. यानंतर चिंपाझी आई खूप दु:खी झाल्याचही पाहायला मिळत आहे. बाळावर उपचारानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी बाळाला पुन्हा चिंपांझीकडे सोडलं. आपलं बाळ जिवंत आहे हे बघून त्या आईचा आनंद गगनात मावत नाही आणि क्षणात ती बाळाला मिठीत घेते. आई आणि तिच्या बाळाचं पुनर्मिलन झालेलं यावेळी पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – इन्स्टाग्रामवर तरुणाची suicide note व्हायरल..’गुडबाय’ म्हणत तरुण निघाला तेवढ्यात पोलिसांनी केलं असं काही की; तुम्ही म्हणाल…

दरम्यान हा व्हिडीओ prostylejduce या इन्स्टग्राम अकाऊंचवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत 3 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. तर अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.