एक बहिण आणि भाऊ यांच नाते खूप खास असते जिथे थोडी मस्ती असते, थोडी मस्करी असते आणि खूप सारे प्रेम असते. बहिण-भावातील पवित्र आणि प्रेमळ नाते दर्शवणारा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये एक इंडिगोमध्ये एअरहोस्टेस असलेल्या बहिणींने तिच्या कंपनीतच रुजू झालेल्या लाडक्या भावाचे हटके पद्धतीने स्वागत केले आहे. जेव्हा भाऊ फ्लाईटमध्ये आला त्याला सरप्राईज दिले. बहिण-भावाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

इंडिगोमध्ये एअरहोस्टेस असलेल्या रिया राजेश देवकर हिने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिन भाऊ हर्ष देवकरला खास सरप्राईज दिल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “देवकर कुटूंबातून ६इ (6E) कुटुंबापर्यंत! मला माझ्या लहान भावाबद्दल खूप अभिमान आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, अभिनंदन”

हेही वाचा – Leap Year 2024 : २९ फेब्रुवारीला ‘या’ देशात महिला करतात पुरुषांना प्रपोज! जाणून घ्या लीप वर्षातील रंजक गोष्टी

व्हिडीओमध्ये दिसते आहे की, हर्ष याने विमानात प्रवेश करताच रिया त्याला गळाभेट देऊन आनंद व्यक्त करते. रियाने इंडिगोचा एअरहोस्टेसच्या पोशाखा परिधान केलेला दिसत आहे. तर हर्ष त्याच एअरलाइनच्या ग्राऊंड स्टाफच्या पोषखात दिसत आहे. व्हिडीओमध्ये पुढे दिसते की, रिया हर्षाला दिलेल्या खास सरप्राइजबद्दल सांगते जे तिने स्वत: तयार केले आहे आणि त्याच्यासाठी खास संदेश लिहिलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो क्षणदेखील दाखवला आहे जेव्हा हर्ष इंडिगोमध्ये असोसिएट इंजिअरिंग म्हणून रुजू झाला होता.

हेही वाचा – “याला म्हणतात साधेपणा!” ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी असूनही रस्त्यावर पुस्तक खरेदी करताना दिसल्या अक्षता मूर्ती, Video Viral

व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. त्यानंतर, व्हिडिओ २.२ मिलियनपेक्षा जास्तवेळा पाहिला आहे आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करून दोघांचे कौतुक करत आहे. व्हिडीओवर हर्षने देखील कमेंट करत, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगितले आहे

एक इंस्टाग्राम वारकर्त्याने सांगितले, “हे खूप भावुक करणारे आहे.” दुसऱ्याने लिहिले, “छोटे-छोटे क्षण महत्त्वाचे असतात,” तिसऱ्याने पोस्ट केले, “इतका सुंदर क्षण.” चौथ्याने लिहिले, “दोघांसाठी गौरवाचा क्षण.”