प्राणी प्रेमाच्या अनेक गोष्टी वाचण्यात आणि ऐकण्यात येत असतात. प्राणी प्रेमींचे त्यांनी पाळलेल्या प्राण्यांवर अतोनात प्रेम असते. या प्रेमापोटी ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र एका व्यक्तीने तर प्राणी प्रेमाची हद्दच पार केली आहे. एका व्यक्तीने बकरीसोबत लग्न केलंय, हे जर आम्ही सांगितलं तर? ऐकूनच तुम्ही हैराण झाला असाल. पण हे प्रत्यक्षात घडलंय. काही दिवसांपूर्वी गुजरातमधल्या क्षमा बिंदू या मुलीने स्वतःशीच लग्न केल्याची घटना चर्चेत आली आहे. यावरून बराच गदारोळ देखील झाला. अशा अजब गजब लग्नाचे हे प्रकरण अजूनही थांबलेलं नाही. यापाठोपाठ आणकी एका विचित्र लग्नाचे प्रकरण समोर आलं आहे. एक व्यक्तीने चक्क बकरीसोबत लग्न केलंय. हा व्यक्ती इंडोनियामध्ये राहणारा आहे. सैफुल आरिफ असं या ४४ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. इंडोनेशियामध्ये बेनजेंग जिल्ह्यातल्या क्लॅमपोक गावात हा व्यक्ती राहतो. गेल्या ५ जून रोजी या व्यक्तीने रितसर पारंपारिक विधीनुसार हे अजब लग्न केलंय. आणखी वाचा : VIRAL VIDEO: डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत मोबाईल हिसकावला, ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याचा शहाणपणा नडला या लग्नात व्यक्ती नववधूचे कपडे घालून सजून धजून बसलेला होता. इतकंच नव्हे तर बकरीला सुद्धा एका नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. या अजब लग्नासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांसमोर या व्यक्तीने बकरीला पत्नी म्हणून स्विकारलं. सोबतच एकत्र जगण्या मरण्याची शपथ देखील घेतली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आणखी वाचा : VIRAL VIDEO : लेकाला सायकलवर आरामात बसता यावं म्हणून आईने केलेला हा Desi Jugaad एकदा पाहाच इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ : आणखी वाचा : सायकल चालवता चालवता गोरिला धापकन खाली पडला, रागात त्याने काय केलं? पाहा VIRAL VIDEO अनेक न्यूज चॅनेल्सनीही हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर या व्यक्तीवर जोरदार टीका करण्यात आली. एका व्यक्तीने ट्विट करून लिहिले की, या व्यक्तीने मानसिक संतुलन गमावले आहे. त्याला उपचाराची गरज आहे. दुसऱ्या व्यक्तीने लग्नात सहभागी असलेल्या लोकांवर आणि तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली. या अजब लग्नावरून वाद वाढत असल्याचे पाहून व्यक्तीने पुन्हा सोशल मीडियावर समोर येऊन आपली बाजू मांडली आहे. हा व्हिडीओ त्यांच्या वतीने विनोद म्हणून बनवण्यात आल्याचं त्यांने स्पष्ट केलं. हे लग्न प्रत्यक्षात झाले नाही. व्हिडीओमध्ये जे काही दिसत आहे तो त्याच्या अभिनयाचा भाग आहे, त्यामुळे लोकांनी ते खरे मानू नये, असं देखील तो म्हणाला.