सोशल मीडियावर लहान मुलांचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडीओ पाहिल्यावर आपण पोट धरुन हसतो. तर कधी-कधी त्यांचा निरागस भाव पाहून आपल्या डोळ्यात पाणी येते. आपल्याकडे ‘मुलं ही देवाघरती फुलं’ असे म्हटले जाते. काही वेळेस ही लहान मुलं अशा गोष्टी करता, ज्यांचा विचार आपल्या मनात येतच नाही. मोठ्यांना लाजवेल असं काम मुलं नकळत करुन जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधल्या गोंडस मुलांची चर्चा लोकांमध्ये होत आहे.

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मेढीच्या कोकरासह खेळत असल्याचे दिसते. हे कोकरु त्याच्या आईपासून लांब गेल्याचे मुलाला समजते. कोकरांची आणि त्याची आईची भेट घालून देण्यासाठी तो लहान मुलगा प्रयत्न करतो. कोकराची आई म्हणजेच मेंढी ज्या दिशेला असते, तिकडे कोकराला पाठवत असतो. बोट दाखवून तुझी आई तिकडे आहे असे म्हणत असतो. पुढे काही अंतरावरुन मेढी आपल्या पिल्लाला पाहते. त्यानंतर मेढी धावत पिल्लाकडे येते. पिल्लाची भेट झाल्यानंतर मेढी आणि ते कोकरु तिकडून निघून जातात.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”

आणखी वाचा – लग्नाची अट मान्य करत सुशिक्षित तरुणाने केलं दोन सख्ख्या बहिणींशी लग्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

@Yoda4ever Monday या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला २ मिलियन म्हणजेच २० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. ६०,००० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हायरल व्हिडीओ लाइक केला आहे. त्याशिवाय ९ हजार यूजर्सनी व्हिडीओ रिट्वीट केला आहे. नेटकऱ्यांनी या गोड व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने त्या मुलाला Cute म्हटले आहे. तर काही यूजर्सनी त्या लहान मुलाच्या निरागसतेची प्रशंसा केली आहे. हा व्हिडीओ अन्य साइट्सवरही व्हायरल होत आहे.