Viral Video: आपल्यातील बरेच जण शिक्षण, नोकरीसाठी घरापासून दूर दुसऱ्या शहरात राहतात. कुटुंबातील सदस्यांची आठवण आली की, त्यांना व्हिडीओ कॉल करणे, त्यांना फोन करून त्यांचा आवाज ऐकणे यापलीकडे प्रत्यक्ष जाऊन कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींना भेटण्यात एक वेगळेच सुख असते. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत स्वतःच्या काकांना परदेशातून आलेले पाहून मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसते आहे.

व्हिडीओत एक चिमुकला शाळेतून परत येतो आणि काका आले का, असे वारंवार स्वतःच्या आईला विचारतो. कारण- या चिमुकल्याला त्याच्या काकांनी आज ते कॅनडावरून भारतात परत येणार, असे वचन दिले होते; तसे त्या चिमुकल्याने शाळेतील शिक्षिकेलासुद्धा सांगितले होते. त्यामुळे शाळेतून परतल्यावर चिमुकला घराच्या प्रत्येक खोलीत काकांचा शोध घेताना दिसतो. तर, काका-पुतण्याची भेट होते का ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, काकांनी चिमुकल्याला वचन दिलेले असते की, चिमुकला शाळेतून परत येईपर्यंत ते कॅनडावरून भारतात परत आलेले असतील. त्यामुळे काका दुसऱ्या खोलीत लपलेले असतात आणि चिमुकला शाळेतून येताच ते त्याला सरप्राईज देतात. चिमुकला काकांना पाहून आनंद व्यक्त करतो आणि अलगद त्यांना मिठी मारतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nav.danish या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहिलेय, “या व्हिडीओने तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून दिली असेल”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहेत आणि काका व पुतण्या यांच्यातील या खास नात्याचे विविध शब्दांतून कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.