बिर्याणी, पुलाव बनवायचे म्हटले की, लांब दाणा असलेला बासमती तांदूळ आवर्जून वापरला जातो. बाजारात चांगल्या दाण्याचा बासमती तांदूळ हा साधारण १०० रुपये किलो वगैरे किमतीला मिळतो. परंतु, हा तांदूळ दररोज खाण्यासाठी सर्वांनाच परवडेल, असे नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक अफलातून व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडीओमध्ये माहिती देणारी व्यक्ती केवळ १० रुपयांमध्ये बासमती किंवा आंबेमोहोरासारखा भात बनविता येऊ शकतो, असे सांगत आहे. मात्र, हे कसे शक्य आहे ते पाहू. तसेच यावर नेटकरी काय म्हणतात आहे हेसुद्धा जाणून घेऊ.

तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर hitesh_the_jadhav नावाच्या अकाउंटने व्हायरल होणारा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये नेमके काय आहे पाहा.
तर, सुरुवातीला व्हिडीओमधील एक माणूस एका झाडाची पात तोडून, व्हिडीओ बनविणाऱ्या व्यक्तीला वास घेण्यास देते. त्यानंतर, “या झाडाला बासमतीची पात किंवा आंबेमोहराची पात असे म्हणतात,” अशी माहिती तो सांगतो. तसेच या झाडाची केवळ एक पात अगदी सध्या रेशनच्या तांदळालादेखील बासमतीसारखी चव आणि वास देऊ शकते, असे माहिती देणाऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा : अशी भन्नाट ‘सायकल कॉफी’ आजपर्यंत कुणी पाहिली नसेल! Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

त्यासाठी कोणताही साधा किंवा रेशनचा भात घ्यायचा आणि तो शिजविताना त्यामध्ये या झाडाची जुनी पात टाकून द्यायची. असे केल्याने कुकरच्या पहिल्या शिटीत अगदी लांबपर्यंत बासमती भातासारखा घमघमाट सुटेल, असेही माहिती देणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. ही अफलातून माहिती ऐकून आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे ते पाहू.

“माझ्याकडेही आहे असं झाड. मला प्रचंड आवडते ते. मी आणलं होतं ते एका ठिकाणाहून.” असे एकाने लिहिले आहे. “हे आमच्या दारात आहे. आम्ही याला अन्नपूर्णा झाड, असं म्हणतो.” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “हे रोप ऑनलाइनसुद्धा मिळत आहे”, अशी माहिती तिसऱ्याने दिली. चौथ्याने, या पांदणाच्या पानांचा वापर करून आपण केकसुद्धा बनवू शकतो. हे झाड व्हॅनिला इसेन्सला एक चांगला पर्याय आहे. सिंगापूर आणि थायलंडमध्ये यापासून स्वादिष्ट पांडन केक बनवतात.” अशी माहिती दिलेली आहे. तर शेवटी पाचव्याने, “माझ्याकडेपण आहे हे झाड. याचे आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आहेत,” असे सांगितले.

हेही वाचा : Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…

सोशल मीडियावर @hitesh_the_jadhav या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ३.२ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.