पक्ष्यांच्या किलबिलात उगवणारी सकाळ किती छान असते. आपल्या आजूबाजूला कितीतरी लहान-मोठे पक्षी असतात. त्यांचं राहणीमान, दिनचर्या, वेगवेगळ्या हालचाली, त्यांची सुंदर घरटी, त्यांच्या सवयी, पक्ष्यांची पिल्ले हे सारं चित्र पाहताना भान अगदी हरपून जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पक्ष्यांच्या जीवनातील ५१ दिवसाची दिनचर्या दाखवण्यात आलीय. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला सुद्धा आनंद होईल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका पक्ष्याने कुशलतेने घरटे बनवले आणि नंतर त्यात अंडी घातली. हा टाइम-लॅप्स व्हिडीओ ५१ दिवसांचा आहे आणि यात पक्ष्याचं जीवन दाखवण्यात आलंय. हा व्हिडीओ बुइटेंजेबेडेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. छोट्या व्हिडीओमध्ये एक पक्षी एका पेटीत घरटे बनवताना दिसतो. तिने आपले घरटे बनवण्यासाठी पाने, डहाळ्या, गवत आणि सुका कचरा गोळा केला. त्यानंतर तिने घरट्यात अंडी घातली आणि आपल्या पिल्लांना जन्म दिला. तिच्या बाळांची वाढही या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. ती आपल्या पक्ष्यांचं कशा प्रकारे संगोपन करते हे देखील दाखवण्यात आलंय.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका

आणखी वाचा : २६० वर्ष जुन्या सोन्याच्या रथात बसून Charles III राज्याभिषेकासाठी जाणार, जाणून घ्या काय आहे या रथात खास?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरेरे हे काय…चोराने चक्क रस्त्यावरच्या गटाराचं कव्हरंच पळवलं, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील देण्यात आलीय. ‘अतिशय मेहनती आई’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आवर्जून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ८२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर पक्षीच्या मेहनतीचं कौतूक करताना दिसत आहेत.