scorecardresearch

‘मेरा पिया घर आया’ म्हणत लग्नात नवरीने मैत्रिणीसोबत केली जबरदस्त एन्ट्री, धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित

मैत्रिणीसोबत नवरीबाईने केलेला हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून सारेच जण चकित झाले आहेत. तुम्ही सुद्धा हा व्हायरल व्हिडीओ…

Bride-Dance-Video-Viral
(Photo: Instagram/ ruchi_khairwar10)

इंटरनेटच्या दुनियेत कधी काय पहायला आणि ऐकायला मिळेल, याचा काही नेम नाही. इथे दररोज हजारो लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. पण त्यातील मोजकेच लोक आपली छाप निर्माण करतात. लग्न समारंभ म्हणजे मनसोक्त डान्स, मजा, मस्ती. हल्लीचा हा ट्रेंडच झाला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये मैत्रिणीने तिच्या मैत्रिणींसोबतच धमाकेदार एन्ट्री केलीय. मैत्रिणीसोबत नवरीबाईने केलेला हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून सारेच जण चकित झाले आहेत. तुम्ही सुद्धा हा व्हायरल व्हिडीओ…

गेल्या काही वर्षात लग्नातील अनेक मजेशीर आणि काही अतरंगी किडे असणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कधी मित्र-मंडळी मजा करताना तर कधी रुसवे फुगवे काढतानाचे हे मजेशीर व्हिडीओ लोकांनी पाहायला आवडतात. या व्हिडीओमध्ये नवरी तिच्या मैत्रिणी आणि बहिणींच्या ग्रूपसोबत सगळ्यांसमोर दणकून नाचत आहेत. डान्स करत करत ती स्टेजच्या दिशेने मंडपात एन्ट्री करताना दिसून येतेय. सध्या हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरूवातीला लोक आश्चर्यचकित होत आहेत आणि पण नंतर नवरीचा डान्स पाहून ते या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत.

आणखी वाचा : याला म्हणतात कर्माचे फळ! उंटाला त्रास देत होता हा माणूस आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लग्नाच्या सुंदर वातावरणात सुरू असलेल्या जयमाला विधीमधला आहे. जयमाला विधीसाठी ही नवरीबाई मंडपाकडे येताना दिसत आहे. त्याचवेळी बॅकग्राऊंडला ‘मेरा पिया घर आया’ हे गाणं वाजू लागतं. तिच्या दोन्ही बाजुला रांगेत नवरीच्या बहिणी आणि मैत्रिणींचा ग्रूप थिरकताना दिसून येतोय. कुणी हाताने टाळी वाजवत तर कुणी डान्स स्टेप करत या नवरीची धमाकेदार एन्ट्री करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : व्हिडीओसाठी काहीही! थेट त्सुनामीच्या भयानक लाटांमध्ये गेले अन् पुढे जे घडलं ते पाहून हैराण व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : व्हीलचेअरवर बसलेला दिव्यांग अचानक खाली पडला अन् चालायला लागला! पाहून तुम्ही थक्क व्हाल, पाहा VIRAL VIDEO

@ruchi_khairwar10 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सध्या या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला ५ लाख ३८ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केलं आहे. त्याचबरोबर नववधूने केलेल्या मनमोहक नृत्याचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video the bride took a tremendous entry with the sisters on mera piya ghar aaya song prp