Viral Video: जगात मदतीची भावना कमी झाली आहे असं अनेकदा म्हटलं जातं. पण, काही जण याला अपवाद असतात. ते अनेकांच्या कठीण परिस्थितीत इतरांची मदत करण्यास धावून जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बस स्टॉपवर बसलेल्या तरुणीचा अचानक स्कर्ट फाटतो. तेव्हा अज्ञात व्यक्ती तिच्या मदतीसाठी धावून जाते.

व्हायरल व्हिडीओत एक शेतकरी शहराच्या बस स्टॉपवर येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्याकडे घड्याळ नसल्यामुळे तो अनोळखी व्यक्तीला वेळ आणि बसचा मार्गही विचारतो, त्यामुळे ती अनोळखी व्यक्ती चिडते. नंतर शेतकरी बसची वाट पाहत असतानाच एक तरुणी तिच्या प्रियकरासह आली आणि मागे बस स्टॉपवर बसली. काही वेळाने प्रियकर उठतो आणि तरुणीलाही उठायला सांगतो. ती सीटवरून उठताच तिचा स्कर्ट मागून फाटतो. प्रियकराने पुढे काय केलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…उष्णतेमुळे तहानलेला उंट रस्त्यावर पडला; ट्रक चालक देवदूत बनून आला अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा जोडीदार तरुणीचा स्कर्ट फाटलेला पाहतो तेव्हा जोरजोरात हसू लागतो. पण, शेतकरी स्वतःची परिधान केलेली लुंगी काढून तिला अंगावर ओढून घ्यायला सांगतो. हे पाहून तरुणी भावूक होते आणि शेतकऱ्याच्या पाया पडते आणि प्रियकराला त्याच्या वागण्यावरून खडेबोल सुनावते व येथेच व्हिडीओचा शेवट होतो.

एखाद्याच्या कठीण प्रसंगात कशाप्रकारे मदत केली पाहिजे हे दाखवण्यासाठी हा व्हिडीओ चित्रित केला असला तरीही या व्हिडीओतील संदेश प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहचला आहे एवढं नक्कीच. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @writer_abhi__143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओतून दिलेल्या या खास संदेशाचं कमेंटमध्ये कौतुक करत आहेत.