Viral Video: बॅडमिंटन हा अशा खेळांपैकी एक आहे, जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खेळायला आवडतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये बिल्डिंगखाली एकत्र येऊन हा खेळ अगदी आनंदाने खेळला जातो. पण, प्रत्येक खेळाचे काही नियम आहेत. तसेच हे खेळ खेळण्यासाठी काही खास वस्तूंचीही गरज लागते. उदाहरणार्थ, जसं फुटबॉल खेळण्यासाठी दोन संघ आणि फुटबॉल लागतो. तसंच बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन व्यक्ती, बॅडमिंटन रॅकेट आणि शटलकॉकची गरज असते. पण, आज व्हायरल व्हिडीओत काही तरी खास पाहायला मिळालं आहे.

तर व्हायरल व्हिडीओत बॅडमिंटन खेळण्यासाठी बॅडमिंटन रॅकेट आणि शटलकॉक तर आहेतच, पण जोडीदार मात्र अनोखा आहे. काही तरुण मंडळी गरुडाबरोबर बॅडमिंटन खेळताना दिसून आले आहेत. सुरुवातीला एक तरुण बॅडमिंटनने शॉट मारतो आणि एक गरुड येऊन शटलकॉक झेलतो. एकदा पाहाच हा अनोखा खेळ.

हेही वाचा…VIDEO: वा रं पठ्ठ्या! भारतीय तरुणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद; सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, पण कसं ते पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण आणि तरुणी उद्यानात बॅडमिंटन हा खेळ खेळत आहेत. तरुण बॅडमिंटनच्या सहाय्याने हवेत शॉट मारतो, त्याच वेळेस तिथे एक गरुड येतो आणि शटलकॉक झेलतो. त्यानंतर तरुणी शॉट मारते आणि पुन्हा गरुड येतो आणि शटलकॉक झेलताना दिसतो. जणू काही या तरुण मंडळींनी या गरुडाला ट्रेनिंगच दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ समृद्धी युजरच्या @samruddhi_khatri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘तुम्ही कधी असं बॅडमिंटन खेळला आहात का?’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा अनोखा खेळ पाहून नेटकरी कमेंटमध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.