Viral Video: शाळकरी मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे रुबिक क्यूबचे कोडे. हा रुबिक क्यूब सोडवताना नाकी नऊ येतात. तरीही हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येकालाच करायचा असतो. पण, तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. आज एका व्यक्तीने साबणाच्या बुडबुड्यात रुबिक क्यूब ठेवून कोडे काही सेकंदात सोडवून दाखवलं आहे आणि जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरले आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील सायबर सुरक्षातज्ज्ञ चिन्मय प्रभू यांनी ३२.६९ सेकंदात रुबिक क्यूबचे कोडे सोडवून दाखवले आहे. पण एवढचं नाही, तर या तरुणाने साबणाच्या पाण्याचे एक वर्तुळ (बुडबुडा) तयार करून हे कोडं सोडवून दाखवलं आहे. एकदा पाहाच तरुणाने शेअर केलेला हा व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: UPSC मध्ये टॉप केलेल्या आदित्य श्रीवास्तवचं जोरदार सेलिब्रेशन, मित्रांचं प्रेम पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चिन्मय प्रभू एका टेबलावर साबणाच्या पाण्याचा एक मोठा बुडबुडा तयार करतो. अलगद त्यात क्यूबचे कोडे सरकवतो. तसेच तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तरुणाने यादरम्यान साबणाचा बुडबुडा फुटू न देता, फक्त ३२ सेकंदात हे कोडे सोडवून दाखवले. वेळ नमूद करण्यासाठी त्याने मागे टायमरसुद्धा लावला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) यांच्या अधिकृत @guinnessworldrecords इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये भारतीय तरुणाचे कौतुक करण्यात आलं आहे. नेटकरी तरुणाचे हे अनोखे कौशल्य पाहून थक्क होत आहेत आणि कमेंटमध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.