आजकाल, लग्नाच्या फोटोशुट करण्याचा ट्रेंड आहे. त्यातही लोकांना काहीतरी फॅन्सी, लक्ष वेधून घेणाऱ्या थीम हव्या असतात असतात. काही लोकांना फक्त सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असते त्यासाठी ते काहीही करतात. आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक लग्नाचे फोटो शूट पाहिले असतील. पण सध्या एका लग्नाच्या फोटोशूटचा हटके व्हिडीओ व्हायरल होत आहे. फोटोशूटसाठी नवरीने जे काही केले आहे ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

फोटोशूट करताना प्रत्येक जोडप्याला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते पण इतकं वेगळं काहीतरी असू शकेल याची कल्पना मात्र कोणीही केली नसेल. या नववधूने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि चक्क लाल लेहेंगा परिधान करून नवरीच्या पोशाखामध्ये ही तरुणी एका गार्डनमध्ये पोहचली. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं. या नववधूने गार्डनमध्ये जाऊन नवरदेवासह इतर जोडप्यांसारखे फोटो काढले नाहीत तर चक्क व्यायाम करतानाचे फोटोशूट केले आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. या तरुणीने नववधूप्रमाणे कपडे परिधान करून गार्डनमध्ये चक्क व्यायाम करताना फोटोशूट केले आहे.

pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती
Pune accident bribe
Pune Accident : रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी लाखो रुपयांची लाच? ससूनच्या कर्मचाऱ्याकडून रोख रक्कम जप्त
Rural Medical Center, transfer a organization from old to new generation, daughter in law, mother in law,
सांधा बदलताना : हस्तांतरण..
why Akshay Kumar wakes up 'two and a half hours' before his wife and kids
“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा
ravindra dhangekar on pune accident
“पुणे अपघातप्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलंय”, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप; रोख नेमका कोणावर?
Patanjali soan papdi fails quality test
रामदेव बाबांना पुन्हा धक्का, पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास
Parbhani collage going boy earn 60 thousand in month by selling pizza
परभणीचा पठ्ठ्या वयाच्या १७व्या वर्षी महिन्याला कमावतोय ६० हजार; असं करतो तरी काय? VIDEO पाहून व्हाल अवाक्
nagpur crime, nagpur rape, nagpur lure of marriage rape
प्रियकराची लग्नास ना; अन्य युवकांसोबत लग्न करण्यास मनाई, यामुळे तरुणीने…

हेही वाचा – भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच

भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये परिधान केला जाणारा लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये ही तरुणी गार्डनमध्ये एका खांबावर चढून कसरत करताना दिसत आहे. एवढा जड लेहेंगा परिधान करून तरुणी सहजतेने कसरत करत आहे हे पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तरुणी एका आडव्या खांबावर हातांचा वापर करून लटकत आहे आणि पुढच्या क्षणी ती खांबाभोवती गोल गिरकी घेते. त्यामुळे तिचा डोक्यावरील ओढणी पुढच्या बाजूला येते तरीही तरुणी कसरत करणे सोडत नाही. हे पाहून समोर उभे असलेला नवरदेव तिच्या मदतीला पुढे येतो. मजेशीर गोष्ट अशी की जेव्हा ही तरुणी कसरत करताना खांबावर गोल गिरकी मारते तेव्हा नवरदेवाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. नवरीचा उत्साह पाहून तो देखील चकित झाल्याचे दिसते आहे. याव व्हिडीओवर आणि नवरदेवाच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा –किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आजच्या काळात लग्नाचे व्हिडीओ शुट करणे फारच अवघड झाले आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नवरदेवाची अवस्था पाहून एकाने लिहिले की, “भाऊ तिथेच उभा राहून त्याच्या आयुष्याबाबत विचार करतो आहे” दुसरा म्हणाला की, “ओढणी पुढे आल्याचे पाहून मेकअप आर्टिस्ट कोपऱ्यात रडत आहे.”

तिसऱ्या वापरकर्त्याने तरुणीच्या समर्थनासह विचारले, “हे आश्चर्यकारक आहे. जो कोणी याचा तिरस्कार करतो त्याची मला दया येते ज्याला त्यांचे दुःख इतरांना सांगण्याची परवानगी दिली जाऊ नये. ” तर चौथ्याने लिहिले, “जेव्हा ते “घूमर” हे गाणे तुमचे एंट्रीच्या वेळी वाजवले जाते तेव्हा” पाचव्याने निष्कर्ष काढला, “नवरदेवाला असे वाटत असेल “हे ठरले नव्हते.” आणखी एकाने लिहिले,”नवरदेव लेडी टायगर शेरॉफसह लग्न करत आहे”