अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी मंगळवारी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या ‘अकाय’च्या जन्माची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली. अनुष्का आणि विराटाच्या मुलाचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी झाला आहे. ही बातमी समोर आल्यापासून दोघांचे चाहते खूप खूश आहेत. दरम्यान अनुष्का आणि विराटचा मुलगा कसा दिसत असेल हे पाहण्याची उत्सूकता त्यांच्या चाहत्यांना आहे. दरम्यान उत्साही चाहत्यांनी ज्युनियर कोहली कसा दिसत असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अनुष्का शर्मा-विराट कोहलीचा मुलगा ‘अकाय’ AI निर्मीत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अकाय’च्या AI निर्मीत फोटोने इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ते तुफान व्हायरल होत आहेत. एका एक्स वापरकर्त्याने पोस्टोस्ट वापरून तयार केलेल्या ‘अकाय’च्या ओ चित्रांचा ‘अकाय’चे AI निर्मीत फोटो शेअर केले आणि लिहिले, “AIने ‘अकाय’ कोहलीचे काल्पनिक चित्र तयार केले आहे.” या पोस्टमध्ये अकायचे चार वेगवेगळ्या पोशाखातील ‘काल्पनिक’ हसरे फोटो दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि विराटची झलकही पाहायला मिळते.

ही पोस्ट १३ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि अनेकांची पसंती मिळाली आहे. अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. अनुष्काच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली की, अकायचे अनुष्काच्या चेहऱ्याशी साम्य दाखवण्यात आले नाही. एकाने कमेंट केली की, “अनुष्काची झलक का नाहीये?” दुसऱ्याने लिहिले, “विश्वास ठेवा किंवा नाही, AI वाईट आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “गोंडस.”

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मंगळवारी एक नोट शेअर करून ही बातमी जाहीर केली. त्यांच्या बाळाचे नाव सांगताना त्यांनी लिहिले, “अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला सर्वांना हे सांगताना आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले. स्वागत आहे! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाव्या अशी सदिच्छा आहे. प्रेम आणि आभार. विराट आणि अनुष्का.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli anushka sharma baby boy akaay ai photos goes viral snk
First published on: 23-02-2024 at 19:52 IST