भारतीय व्यवसायिक व आयपीएलचे संस्थापक ललित मोदी व अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशीपची चर्चा मागील काही दिवसात प्रचंड व्हायरल होत होती. ललित मोदी यांनी आपल्या लेडी लव्ह सोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मिम्सचं वादळ आलं. यांनतर लगेचच मोदींनी आपला इंस्टाग्राम बायो बदलून त्यातही सुष्मिताचा उल्लेख केला. मग तर ट्रोलर्सनी, फॅन्सनी कमेंट्स व पोस्टच्या माध्यमातून या दोन्ही लव्ह बर्ड्सना भंडावून सोडलं. अखेरीस सुष्मिताने स्वतः एक पोस्ट करत यावर स्पष्टीकरण दिलं. या स्पष्टीकरणात तिने वापरलेला हॅशटॅग #NOYB बद्दल अनेक प्रतिक्रिया तिच्या कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळाल्या. सुष्मिताने वापरलेल्या या हॅशटॅगचा अर्थ बराच सर्च केला गेला. आजच्या या लेखात आपण असेच काही ऑनलाईन सर्रास वापरले जाणारे शॉर्ट फॉर्म्स व त्यांचे अर्थ पाहणार आहोत.

शॉर्ट फॉर्म्स म्हणजे Acronyms किंवा अब्रेव्हेशन हे वेळ वाचवण्यासाठी चॅट मध्ये वापरले जातात. यातील काही कॉमन शब्द Plz, Sry, GN/GM, LOL हे सर्व आपणही ऐकले असतील पण असे काही शब्द आहेत ज्यांचे अर्थ पटकन लक्षात येत नाहीत अशा शब्दांची यादी इथे देत आहोत.

Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
how to make Pooris Without Rolling Pin
लाटणं न वापरता झटपट बनवा टम्म फुगणारी गोल पुरी! वेळ वाचवण्याचा देशी जुगाड, पाहा Viral Video
  • #NOYB – नन ऑफ युअर बिझनेस
  • #ROFL – रोलिंग ऑन द फ्लोअर लाफिंग
  • #IFYP – आय फील युअर पेन
  • #YOLO- यु ओन्ली लिव्ह वन्स
  • #SMH – शेकींग माय हेड
  • #NGL – नॉट गोइंग टू लाय (खोटं बोलणार नाही)
  • #NVM – नेव्हर माईंड
  • #IKR – आय नो राईट (मला माहितेय)
  • #IDK- आय डोन्ट नो (मला माहित नाही)
  • #IDC- आय डोन्ट केअर
  • #OFC – ऑफकोर्स
  • #IMO – इन माय ओपिनियन
  • #G2G- गॉट टू गो
  • #PAW – पॅरेन्ट्स आर वॉचिंग
  • #TIME – टिअर्स इन माय आईज

गंमत म्हणजे अनेकदा हे शॉर्ट फॉर्म्स जर चुकीच्या ठिकाणी वापरले जातात. उदाहरणार्थ जर का तुम्ही #YOLO हे सूचना म्हणून वापरलेत तर ते चुकीचं ठरेल कारण याचा अर्थ तुम्ही एकदाच जगायचंय, मज्जा करा असा होतो. असे काही फसलेले शॉर्ट फॉर्मचे प्रयोग आणि त्यावरून होणारी गंमत अनेकदा ऑनलाईन दिसून येते. पण तुम्ही मात्र आता हे शॉर्ट फॉर्म सेव्ह करून पुढील वेळी नीट वापरू शकता. त्यासाठी #ATB म्हणजेच ऑल द बेस्ट!