Video : मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे चर्चेत आलेली क्रिप्टोकरन्सी नक्की आहे तरी काय?

मोदी सरकारच्या नव्या विधेयकानुसार काही अपवाद वगळता भारतातील सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे. या वृत्तामुळे अनेक क्रिप्टो चलनांचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये गडगडलाय.

crypto currency
आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे क्रिप्टो बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एक विधेयक मांडणार आहे. या नव्या विधेयकानुसार काही अपवाद वगळता भारतातील सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे. यातून आभासी चलनासंदर्भातील व्यवहार नियमन करण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र या वृत्तामुळे अनेक क्रिप्टो चलनांचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये गडगडलाय. असे असले तरी अनेकांना क्रिप्टोकरन्सी हे प्रकरण नेमकं काय आहे हे अद्याप माहित नाही आहे. तर, क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? आणि त्याचा इतिहास काय आहे? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून…

या आभासी चलनाचा नफा जास्त असला तरी यामध्ये तोट्याचं गणितही त्याच प्रमाणामध्ये असतं. अजूनही अनेक देशांत अशाप्रकारच्या आभासी चलनाला मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे. म्हणून सरकाने यावर नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: What is cryptocurrency and what is its history pvp

ताज्या बातम्या