Viral Video : साडी हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय महिला कोणताही लहान मोठा कार्यक्रम असो, आवडीने साडी नेसतात. एवढंच काय तर सेलिब्रेटी मंडळी सु्द्धा जागतिक इव्हेंटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना साडी नेसतात. अनेक लोक साडीमध्ये पाहून अवाक् होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंटेट क्रिएटर माही शर्मा जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरताना दिसत आहे. तिला असं साडीमध्ये पाहून तेथील स्थानिक लोकांची प्रतिक्रिया व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हल्ली तरुण मुलींमध्ये साडी नेसायची क्रेझ वाढलेली दिसून येतेय. तरुणी वेगवेगळ्या प्रकारे साड्या नेसतात. तरुणी साडी नेसून सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शे्अर करतात. साडी नेसून त्या मिरवतात. ही तरुणी सुद्धा साडी नेसून जपानच्या रस्त्यावर मिरवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “मुलाला शेती पाहिजे; पण…” असं कसं चालेल म्हणत पुण्यात तरुणानं पोस्टरवर लिहला भन्नाट टोला; Photo पाहून पोट धरुन हसाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये माही शर्माने सुंदर अशी सोनेरी काठ असलेली निळ्या रंगाची साडी नेसली आहे. ती साडी नेसून जपानमध्ये रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिने या साडीवर ट्युब ब्लाउज घातले आहे आणि लांब अशा केसामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे. काही लोक तिच्याकडे अवाक् होऊन बघताना दिसत आहे तर काही लोक कौतुकाने बघत आहे. काही तरुण मुले मुली तिचे फोटो आण व्हिडीओ काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर बॉलीवूड चित्रपत्रातील एक आयकॉनिक म्युझिक लावले आहे.

maahieway या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करत माही शर्मा लिहिते, “मी जपानमध्ये साडी नेसली आणि लोकांच्या प्रतिक्रिया या पाहण्यासारख्या होत्या. मला वाटलं, जपानच्या रस्त्यावर भारतीय पोशाख घालणे हे मजेशीर राहील पण मी अपेक्षा केली नव्हती की लोक मला पाहून अवाक् होतील आणि माझे फोटो काढतील.

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओवर लाखो व्ह्युज आले असून काही युजर्स तिला नीट ब्लाउज न घातल्यामुळे ट्रोल करत आहे.एक युजर लिहितो, “खूप चुकीचे सादरीकरण” तर एका युजरने लिहिलेय, “भारतीय पोशाख सर्वांना आकर्षित करतो आणि तु हे सिद्ध केले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “जे लोक तिला ब्लाउजसाठी ट्रोल करताहेत, खरं तर भारतीय संस्कृतीत महिला ब्लाउज घालाच्या नाही. अनेक युजर्सना तिचा व्हिडीओ आवडला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताहेत.