Bigg Boss 17 Winner: बिग बॉस १७ चा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या क्रेझमध्ये वाढ होत आहे. डोंगरीच्या या ३२ वर्षीय मुलाने बिग बॉस विजेतेपदावर नाव कोरल्याने चाहत्यांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानतर मुनव्वर जेव्हा डोंगरीत परतला तेव्हा शेकडो लोक एकत्र आले आणि त्याला उचलून घेत जल्लोष केला. दरम्यान आता याचवेळी त्याच्या चाहत्यांपैकी एक असलेल्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या तरुणीनं काय केलं हे पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

बिग बॉस जिंकल्यानंतर मुनव्वरने मुंबईतील डोंगरी भागात रोड शो केला होता. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

ही घटना मुंबईतील डोंगरी या भागात घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता. ही महिला दहाव्या माळ्यावर गॅलरीमध्ये लावलेल्या एसीवर बसली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या गॅलरीला ग्रील नाहिये. फक्त एक नायलॉनची जाळी लावलेली दिसत आहे. त्यामुळे जर का महिलेचा तोल गेला तर तिचा गंभीर अपघात होऊ शकतो. पण या अपघाताची पर्वा न करता ही महिला मुन्नावरला निवांत पाहत बसली आहे. यावेळी खाली जमलेल्या मुन्नवरच्या फॅन्सचंही या महिलेनं लक्ष वेधून घेतलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वाटेत मृत्यूनं गाठलं! चालता- चालता तरुणाला आला हार्ट अटॅक; थरकाप उडवणारा Viral Video पाहा

क्रेटा कार अन् ५० लाख रुपयांचे बक्षीस

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर फारुकी याची चर्चा रंगली आहे. ‘लॉकअप’ त्यानंतर बिग बॉस १७ चा विजेता ठरल्यानंतर सर्वत्र मुनव्वर याची चर्चा रंगली आहे. मुनव्वर याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर, बिग बॉस १७ ची ट्रॉफी मिळाली आहे. एवढंच नाही तर, मुनव्वर याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली असून मुनव्वर याला ५० लाख रुपयांचे बक्षीसही मिळालं आहे.

मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल

‘बिग बॉस १७’ विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर मुनव्वरने मुंबईतील डोंगरी भागात रोड शो केला होता. यावेळी बेकायदेशीरपणे ड्रोनचा वापर करण्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही परवानगीशिवाय रोड शोमध्ये ड्रोनचा वापर केल्याने मुनव्वरच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.