अ‍ॅपलचा आयफोन जगभरात लोकप्रिय आहे, पण जेव्हा प्रतिस्पर्धी कंपनीचे अधिकारी iPhone वापरताना दिसतात तेव्हा काही ‘प्रश्न’ नक्कीच उपस्थित होतात. स्मार्टफोन कंपनी Xiaomi चे सीईओ ली जुन (Lei Jun)यांच्याबाबत असंच काहीसं घडलंय. ली जुन यांनी काही दिवसांपूर्वीच चीनमधील आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक पोस्ट शेअर केली होती. पण या पोस्टमुळे त्यांचीच ‘पोलखोल’ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Weibo वर जर एखाद्या युजरने पोस्ट शेअर केली तर ती कोणत्या फोनवरुन केली आहे, याचीही माहिती दिली जाते. ली जुन यांनी पोस्ट केल्यावर ती पोस्ट iPhone वरुन करण्यात आल्याचं Weibo ने दाखवलं. लगेच सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर थोड्याचवेळात जुन यांनी ती पोस्ट डिलीट केली. पण आता या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, Xiaomi Industry Investment Department चे पार्टनर पॅन जिउतांग यांनी जुन यांचा बचाव केला आहे. स्ट्रॅटेजी आणि भविष्यातील योजना दर्जेदार बनवण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्यांचे फोन वापरावे लागतात असे ते म्हणाले आहेत. तर, एकीकडे शाओमीचे स्मार्टफोन मोठमोठ्या कंपन्यांसाठी आव्हान ठरत असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच त्यांच्या ब्रँडवर विश्वास नाहीये का असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत. तर काही नेटकरी हा विबोने दाखवलेला Error होता असंही म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi ceo lei jun social media post reveals he is using an iphone sas
First published on: 14-05-2020 at 09:09 IST