Premium

पुलावर फोटो काढण्यासाठी गेली मुलं, अचानक रेल्वे आल्यामुळे मारल्या उड्या…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेल्वे रुळावर फिरणाऱ्या मुलांचा भयानक अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Young people went to take pictures on the bridge
रेल्वे येताच मुलांनी मारल्या उड्या. (Photo : Instagram)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेल्वे रुळावर फिरणाऱ्या मुलांचा भयानक अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकरी हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत तर अनेकजण तो पुन्हा पुन्हा बघत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी पूर्ण भरलेली एक रेल्वे पुलावरून जाताना दिसत आहे, काही लोक रेल्वेच्या दरवाजात उभे असल्याचंही दिसत आहे. ही रेल्वे पुढे येताच रेल्वे रुळावर फिरणारी मुलं अचानक पुलावरुन खाली उड्या मारताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत रेल्वे जवळ येताच दोन मुलं रुळांच्या शेजारी उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवाय ते या रुळावर फोटो काढण्यासाठी गेल्याचं दिसत आहे. ही मुलं रुळाशेजारी उभी असतानाच रेल्वे आल्याने त्यांचा तोल बिघडतो आणि ते थेट खाली उडी मारतात. या मुलांच्या मागे उभा असलेला एक व्यक्ती रेल्वेचा व्हिडिओ शूट करत होता, यावेळी त्याच्या कॅमेऱ्यात ही सर्व धक्कादायक घटना कैद झाली आहे. तर मुलांचा तोल बिघडल्यामुळे ते खाली पडल्याचं पाहून ट्रेनमधील प्रवाशीही थक्क होतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young people went to take pictures on the bridge suddenly jumped due to the arrival of the train thrilling video viral jap

First published on: 26-09-2023 at 15:51 IST
Next Story
‘तिकिटाला फ्रेम करून ठेवूया!’ लेकीने आई-बाबांसाठी काढले बिझनेस क्लासचे तिकीट…