तुम्ही अनेकदा जुळी मुलं झाल्याचं ऐकलं असेल. अनेकदा एखाद्या माहिलेने तीन बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याच्या बातम्याही वाचल्या असतील. मात्र एकाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सांगणाऱ्याला वेड्यात काढाल. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये खरोखरच असा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी १० बाळांना जन्म देणाऱ्या या महिलेची दखल गिनीज बुकनेही घेतलीय. गोसियामी धमारा सिटहोल असं एकाच वेळी दहा बाळांना जन्म देणाऱ्या माहिलेचं नाव आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. गरोदर असतानाच डॉक्टरांनी या महिलेला सहा बाळं होतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र ७ जून रोजी या महिलेच्या पोटात फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. आम्हाला आठ बाळं होतील असा अंदाज माझ्या पतीने व्यक्त केला होता, असं गोसियामी यांनी म्हटलं आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याने कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
Rohit Sharma 17 times Golden Duck
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

नक्की वाचा >> १५ महिन्यांमध्ये ५०० किमी चालले हे हत्ती; कळप थकून जंगलात झोपल्याचा फोटो जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

गोसियामी यांनी दिलेल्या माहितीनुसार गरोदर असतानाच डॉक्टरांनी त्यांना सहा बाळांसंदर्भातील शंका बोलून दाखवली होती. तसेच याच कारणामुळे गोसियामी यांनी अधिक काळजी घ्यावी असा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता. थोडं सुद्धा बेजबाबदार वर्तन धोकादायक ठरु शकतं असं डॉक्टरांनी गोसियामी आणि त्यांच्या पतीला सांगितलं होतं. याच कालावधीमध्ये गोसियामी एकदा आजारी पडल्या होत्या. मात्र रुग्णालयामध्ये त्यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांना बरं वाटू लागलेलं.

गोसियामी यांच्या मुलांची प्रकृती ठणठणीत असली तरी काही दिवस त्यांना इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. डेली मेल ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार गोसियामी यांना गरोदर असतानाच अनेक अडचणींचा समाना करावा लागला. अनेकदा त्यांच्या पायांना आणि कमरेला त्रास व्हायचं. मात्र या साऱ्या संकटांना तोंड देत त्यांनी दहा बाळांना जन्म दिलाय. गोसियामी या एकाच वेळी सर्वाधिक मुलांना जन्म देणारी पहिली महिला ठरली आहे. गोसियामी यांना आधीच दोन लहान मुलं आहेत.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल

काही आठवड्यांपूर्वीच आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. मोरक्को येथील रुग्णालयामध्ये या महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. असून सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं होतं. २५ वर्षीय हालीमा सिसी असं या नऊ बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचं नाव होतं. हालीमा यांच्या नावे असणारा सर्वाधिक बाळांना एकाच वेळी जन्म देण्याचा विक्रम गोसियामी यांनी जवळजवळ महिन्याभराच्या कालावधीमध्ये मोडीत काढलाय. हालीमा यांनी जन्म दिलेल्या नऊ बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलांचा समावेश आहे.