पुणे: ‘एक भी पुलीसवाला ढंग का नही,’ म्हणत चालकाने पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर घातली गाडी अन्… ; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक केली आहे

Pune Crime, Pune Police, Traffic Police, पुणे,
घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक केली आहे

पुण्यात चालकाने पोलीस कॉन्स्टेबलला गाडीच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढवा सिग्नल चौकात वाहतूक नियमनाचे काम करणार्‍या पोलिसाने एका चारचाकी वाहनचालकाला मागील दंड भरण्यास सांगत अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने अंगावर गाडी घातली आणि ८०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदाराने दंडाची थकीत रक्कम ४०० रुपये भरण्यास सांगितल्याने कार चालकाने अंगावर गाडी घातली. प्रशांत श्रीधर कांतावर असं या चालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी मुंढवा याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली.

काही अंतरावर वाहनचालकाला पकडण्यात यश आलं असून त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत पोलिस कर्मचारी शेषराव जायभाय जखमी झाले असल्याचे मुंढवा पोलिसानी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Driver dragged traffic police on car bonnet in pune svk 88 sgy

ताज्या बातम्या