सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाई दर (CPI) पासून दिलासा मिळाला आहे. या महिन्यात किरकोळ महागाई कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ४.३५ टक्क्यांवर आला आहे. सरकारने आज (मंगळवार) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यत्वे अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे भारतातील किरकोळ चलनवाढ सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ४.३५ टक्क्यांवर आली, ऑगस्ट महिन्यात हा दर ५.३ टक्के होता.

सलग पाच महिने चलनवाढीचा दर आरबीआयच्या कक्षेत राहिला, त्यानंतर मे आणि जूनमध्ये त्याने टक्केवारीची वरची मर्यादा ओलांडली. जुलैमध्ये तो पुन्हा ६ टक्क्यांच्या श्रेणीत होते. या महिन्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत महागाई हा महत्त्वाचा मुद्दा होता. अन्न महागाईत घट झाल्यामुळे किरकोळ महागाई कमी झाली आहे. जुलै महिन्यात अन्न महागाईचा दर ३.९६ टक्के होता जो जून महिन्यात ५.१५ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै २०२० मध्ये किरकोळ महागाई दर ६.७३ होता, तर जून २०२० मध्ये तो ६.२६ टक्के होता.

यावेळी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत देखील RBI चे लक्ष महागाई कमी करण्यावर होते. यामुळे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत यांनी पॉलिसी दरात कोणताही बदल केला नाही.