23 September 2020

News Flash

बारावीनंतरच्या वेगळ्या वाटा

बारावीनंतर करता येण्याजोग्या काही वेगळ्या करिअर क्षेत्रातील अभ्यासक्रमांची ओळख-

| June 13, 2015 08:49 am

बारावीनंतर करता येण्याजोग्या काही वेगळ्या करिअर क्षेत्रातील अभ्यासक्रमांची ओळख-
आयआयटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, डी. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज यांसारख्या देशातील महत्त्वाच्या संस्थांनी बारावीनंतरचे काही वेगळे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतात.
*    एम.एस्सी. इन फोटोनिक्स : कोचीन युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने पाच वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन फोटोनिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमामध्ये अ‍ॅप्लाइड ऑप्टिक्स, लेसर टेक्नॉलॉजी, लेसर अ‍ॅप्लिकेशन, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स, फायबर ऑप्टिक टेक्नॉलॉजी आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑप्टिकल तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन विषयांच्या सरमिसळीतून या नव्या ज्ञानशाखेचा उदय झाला आहे. दूरसंचार, संगणकीय प्रचालन आणि नियंत्रण वैद्यक, संरक्षण आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात याचा प्रभाव आहे. अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील परीक्षेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयात सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत. यात गणितात ५० टक्के गुण मिळणे गरजेचे. या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ फोटोनिक्समध्ये लेसर कार्यप्रणालीचे विविधांगी डिझाइन्स, लेसर साधने, विविध वस्तू आणि धातूंमधील गुणधर्माच्या संशोधनावर भर दिला जातो. या संस्थेने दोन वष्रे कालावधीचा एम.टेक. इन ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड लेसर टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याशिवाय पीएच.डीसुद्धा करण्याची संधी उपलब्ध होते. पत्ता- कोचीन युनिव्हर्सिटि, कोचीन. वेबसाइट- www.cusat.ac.in
*    बॅचलर ऑफ अ‍ॅपेरल मॅन्युफॅक्चिरग अ‍ॅण्ड आंत्रप्रिन्युरशिप- हा अभ्यासक्रम राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. पत्ता- राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट, श्रीपेरम्बुदूर- ६०२१०५, वेबसाइट-  www.rgniyd.gov.in
आणि www.atdcindia.co.in
*    डय़ुएल डिग्री इन बीटेक-एम.एस/ एमटेक- हा पाच वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बीटेक इन इंजिनीअिरग फिजिक्स आणि एम.एस/ एम.टेक पदवी प्राप्त करता येते. एम.एस. ही पदवी अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, अर्थ सिस्टीम सायन्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, एम.टेक- ऑप्टिकल इंजिनीअिरग यापकी कोणत्याही एक विषयात प्राप्त करता येऊ शकते. प्रवेशजागा- २०.
अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ही मर्यादा ६० टक्के गुण. जेइइ-अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेत सरासरीने २० टक्के गुण मिळणे गरजेचे. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) येथे गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि जागेच्या उपलब्धतेनुसार प्राधान्याने नोकरीच्या संधी दिल्या जाऊ शकतात. पत्ता- चेअरमन अ‍ॅडमिशन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
ईमेल- admissionssqrv@iist.ac.in
वेबसाइट-www.iist.ac.in
*    बी. डिझाइन- एम. डिझाइन डय़ुएल डिग्री- २०१५च्या शैक्षणिक सत्रापासून आयआयटी मुंबईअंतर्गत कार्यरत इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरने बी.डिझाइन- एम.डिझाइन हा पाच वष्रे कालावधीचा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम करण्याचा पर्याय तिसऱ्या वर्षांनंतर उपलब्ध होतो. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी UCEED- अंडर ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट परीक्षा आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरमध्ये घेतली जाते. पत्ता- इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर, आयआयटी पवई, मुंबई- ४०००७६. ईमेल- office@idc.iitb.ac
वेबसाइट- www.idc.iitb.ac
या संस्थेमार्फत इंडस्ट्रियल डिझाइन, व्हिज्युएल डिझाइन, अ‍ॅनिमेशन डिझाइन, इंटरअ‍ॅक्शन डिझाइन, मोबिलिटी अ‍ॅण्ड व्हेइकल डिझाइन या विषयांमध्ये एम.डिझाइन आणि पीएच.डी.सुद्धा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
*    इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन डिझाइन- डी. जे. अकॅडमी ऑफ डिझाइन या संस्थेने पाच वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन डिझाइन सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत प्रॉडक्ट डिझाइन, फíनचर डिझाइन, अ‍ॅक्सेसरी डिझाइन, टायपोग्राफी अ‍ॅण्ड पब्लिकेशन डिझाइन, इंटरअ‍ॅक्शन डिझाइन, पॅकेजिंग अ‍ॅण्ड ग्राफिक्स, युनिव्‍‌र्हसल डिझाइन, फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीओ कम्युनिकेशन डिझाइन, अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरातील विविध केंद्रांवर चाळणी परीक्षा घेतली जाते. मुलाखत कोईम्बतूर कॅम्पस येथे आयोजित केली जाते.
नॅशनल स्कूल ऑफ डिझाइनमार्फत घेणाऱ्या चाळणी परीक्षेचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य़ धरले जातात. डिझाइन क्षेत्राच्या कलतपासणीसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. पत्ता- डी. जे. अकॅडमी ऑफ डिझाइन, पोल्लाची हायवे, ओथाक्कालमंडपम, कोईम्बतूर- ६४१०३२. ईमेल- www.djad.in.
*    बी.टेक इन ऑटोमोटिव्ह डिझाइन इंजिनीअिरग- यूपीईएस (युनिव्हर्सिटि ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज) कॉलेज ऑफ इंजिनीअिरग या संस्थेमार्फत अभियांत्रिकी शाखेतील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यातील काही अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- बी.टेक इन ऑटोमोटिव्ह डिझाइन इंजिनीअिरग, बी.टेक इन मटेरियल सायन्स इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन नॅनो टेक्नॉलॉजी, बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग विथ स्पेशलायझेशन इन ई कॉमर्स, रिटेल अ‍ॅण्ड ऑटोमेशन. पत्ता- एनर्जी एकर्स, देहरादून- २४८००७. ईमेल- betech@upes.ac.in   वेबसाइट- www.upes.ac.in
या अभ्यासक्रमांच्या ८० टक्के जागा यूपीईएस इंजिनीअिरग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे भरल्या जातात. अर्हता- दहावी आणि बारावी विज्ञानशाखेत ६० टक्के गुण आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण मिळायला हवेत. २० टक्के जागा भरण्यासाठी जेइइ-मेन परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरले जातात.
*    डय़ुएल डिग्री इन अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड फूड टेक्नॉलॉजी / वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट – आयआयटी खरगपूर या संस्थेने इतर अभ्यासक्रमांसोबतच डय़ुएल डिग्री इन अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड फूड टेक्नॉलॉजी/ वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- पाच वष्रे. प्रवेश- जेइइ-अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर आधारित. पत्ता- आयआयटी, खरगपूर- ७२१३०२. वेबसाइट- www.iitkgp.ac.in
सुरेश वांदिले -ekank@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 8:49 am

Web Title: career options after 12th
Next Stories
1 ‘अॅनिमेशन’मधील वाढत्या संधी
2 कृषी-व्यवस्थापनाचे शास्त्र
3 खगोलशास्त्रातील संधी
Just Now!
X