चामडय़ाच्या विविध वस्तू, पादत्राणे यांची रचना, प्रत्यक्ष निर्मिती आणि विक्री याविषयीचे शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या ‘फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट’ या देशातील आघाडीच्या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांची ओळख-

बारावीनंतर सृजनशील आणि आगळ्यावेगळ्या करिअर पर्यायांच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांना फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेता येईल. या संस्थेची स्थापना केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने केली आहे. चामडय़ाच्या वस्तू, पादत्राणे यांची रचना, निर्मिती, विक्री या विषयांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील आघाडीची संस्था आहे.
या संस्थेचे व्यावसायिक अभ्यासक्रम एफडीडीआय स्कूल ऑफ रिटेल अ‍ॅण्ड फॅशन र्मकडायजिंग, एफडीडीआय स्कूल ऑफ फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड प्रॉडक्शन, एफडीडीआय स्कूल ऑफ फॅशन लेदर अ‍ॅक्सेसरी डिझाइन, एफडीडीआय स्कूल ऑफ फॅशन डिझाइन, एफडीडीआय स्कूल ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड आंत्र्यप्रिन्युरशिप यांच्यामार्फत चालवले जातात.
या संस्थेचे देशभरात नॉयडा, चेन्नई, कोलकाता, रोहतक, फुरसतगंज, गुणा, जोधपूर अशा ठिकाणी कॅम्पस आहेत. या ठिकाणी बारावीनंतर पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतात. या संस्थेने परदेशातील महत्त्वाच्या संस्थांशी शैक्षणिक सहकार्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणावर अद्ययावत ज्ञान मिळते आणि तंत्रज्ञान शिकता येते.  
* एफडीडीआय स्कूल ऑफ फूटवेअर डिझाइन
अ‍ॅण्ड प्रॉडक्शन : गेल्या २५ वर्षांपासून ही संस्था या विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, श्रीलंका, बांगलादेश, इटली, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतील पादत्राणे डिझाइन, निर्मितीच्या क्षेत्रांतील मोठय़ा कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. या उद्योगाची वाढ २५ टक्के वार्षकि दराने होत आहे. संस्थेचा अभ्यासक्रम देश-परदेशातील नामवंत संस्थांच्या तज्ज्ञांनी तयार केला आहे. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
बॅचलर ऑफ डिझाइन इन फूटवेअर डिझाइन :
अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- चार वष्रे. एकूण प्रवेशजागा- ४२०. या अभ्यासक्रमात पादत्राणे डिझाइन, निर्मिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांचा समावेश आहे. अंतिम वर्षांमध्ये निर्मिती तंत्रज्ञान, उत्पादकता आणि गुणवत्ता नियंत्रण, विपणन, विक्री आणि पादत्राणे किरकोळ विक्री व्यवस्थापन, डिझाइन आणि कॉम्प्युटर एडेड डिझाइन या विषयांत स्पेशलायझेशन करण्याची संधी दिली जाते.  
    एमबीए इन फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड प्रॉडक्शन :
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. या अभ्यासक्रमात सामग्रीची माहिती, निर्मितीपूर्व तंत्रज्ञान, पादत्राणे निर्मिती तंत्रज्ञान, शिवणकाम, प्रयोगशाळा परीक्षण,  पादत्राणे तंत्रज्ञान, कच्चा माल व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांचा समावेश आहे.
    मास्टर ऑफ डिझाइन इन क्रिएटिव्ह डिझाइन : अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील उद्योगात डिझायनर, व्हिज्युएल र्मकडायजर, डेव्हलपर, सीएडी/ सीएएम स्पेशालिस्ट, फॅशन ट्रेंड फोरकास्टर, डिझाइन कन्सल्टंट यांसारख्या करिअरच्या संधी मिळू शकतात.
* एफडीडीआय स्कूल ऑफ रिटेल अ‍ॅण्ड फॅशन र्मकडायजिंग :  
    बी. डिझाइन इन रिटेल अ‍ॅण्ड फॅशन र्मकडायजिंग : अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- चार वष्रे. वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना रिटेल स्टोअर व्हिज्युअल र्मकडायजिंग अ‍ॅण्ड डिस्प्ले डिपार्टमेंट, व्हिज्युअल र्मकडायजिंग कन्सल्टन्सी आणि सप्लाय कंपनी, रिटेल र्मकडायजिंग, रिटेल ऑपरेशन्स यांसारख्या करिअरच्या संधी मिळू शकतात.
    एमबीए इन रिटेल अ‍ॅण्ड फॅशन र्मकडायजिंग : अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवारांना व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, रिटेल र्मकडायजर, कॅटेगरी मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, रिटेल मॅनेजर, फ्लोअर मॅनेजर, डिस्ट्रिक्ट मॅनेजर, फॅशन कन्सल्टन्ट आदी करिअरच्या संधी मिळू शकतात.  
*    एफडीडीआय स्कूल ऑफ फॅशन लेदर अ‍ॅक्सेसरी डिझाइन : बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन लेदर अ‍ॅक्सेसरी डिझाइन हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो.
अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- चार वष्रे. वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये
१२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना डिझायनर, र्मकडायजर आणि प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून संधी मिळू शकते. याशिवाय हे विद्यार्थी स्वयंरोजगारसुद्धा सुरू करू शकतात.
राष्ट्रीय पातळीवरील निवडचाचणी
या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय स्तरावरील निवड परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. परीक्षा बहुपर्यायी पद्धतीची आहे. एकूण १५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये गणित- ४५ गुण, इंग्रजी- ४५ गुण, सामान्य विज्ञान- ३० गुण आणि सामान्य ज्ञान- ३० गुण  असे गुणांचे विभाजन केले जाते. कालावधी- १५० मिनिटे. निगेटिव्ह माìकग नाही. ही परीक्षा देशभरातील ३१ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईचा परीक्षा केंद्र म्हणून समावेश असतो.
ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची राहील. ही परीक्षा दरवर्षी जून महिन्यात घेतली जाते.  यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठीची परीक्षा १२, १३ आणि १४ जून २०१५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल जुलच्या पहिल्या आठवडय़ात घोषित करण्यात येतो. अभ्यासक्रमांचा प्रारंभ
१ ऑगस्टपासून होईल. (तथापि, BITSAT, JEE- ADVANCED, VIT, MH CET इत्यादी परीक्षा देऊन विशिष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ही राष्ट्रीय स्तरावरील निवडचाचणी देण्याची गरज नाही. तथापि, गुणवत्ता यादी
तयार करताना या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचे विशिष्ट
सूत्रानुसार राष्ट्रीय स्तरावरील निवडचाचणीमध्ये
मिळालेल्या गुणांसोबत समानीकरण केले जाते. पत्ता- एफडीडीआय, नॉयडा, ए- १०, नॉयडा डिस्ट्रिक्ट, सेक्टर- २४, पिन- २०१३०१. वेबसाइट- http://www.fddiindia.com
ई-मेल- admission@fddiindia.com

नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल ऑटोमेशन सिस्टीम डिझाइन-
हा अभ्यासक्रम कालिकत येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरू केला आहे. कालावधी- सहा महिने. अर्हता- बीई/ बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन). पत्ता- एनआयईएलआयटी, पोस्ट बॉक्स नंबर ५, एन.आय.टी. कॅम्पस, पोस्ट ऑफिस, कालिकत- ६७३६०१.
वेबसाइट- calicut.nielit.gov.in
ईमेल-  trng@calicut.nielit.gov.in
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com